चंद्रपूर

चार चंद्रपूरकर आदिवासी विद्यार्थी माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर

आपल्या अनोख्या कार्यशैलीने, लोककल्याणाच्या आगळ्या योजनांसाठी, गोरगरीबांच्या हितार्थ चाललेल्या धडपडीसाठी, अगदी शासकीय कार्यातही आपल्या शैलीतून रौनक निर्माण करण्याची ख्याती लाभलेले राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यातल्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या एका उपक्रमाचे ऊर अभिमानाने भरून यावा असे फलित समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करत मंत्र्यांच्या धडपडीला अनोख्या यशाचा नजराणा सादर केला आहे.

पुढे वाचा

चंद्रपूर जिल्हयातील पुरातन वारश्याच्या जतनासाठी भरीव निधी उपलब्ध करू

या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्हयातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने या महानगरातील इतिहासकालीन परकोट, मंदिरे, वास्तु तसेच अन्य पुरातन ठेव्याच्या जतन आणि जोपासणेकरिता ऐतिहासिक किल्ल्याचा सौदर्याच्या दृष्टीने विकासाकरीता भरीव निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्राी डॉ. महेश शर्मा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.

पुढे वाचा

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात पक्‍क्‍या रस्‍त्‍यांवर पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे तसेच जिवती तालुक्‍यात वनविभागाशी संबंधीत प्रश्‍नांची सोडवणुक त्‍वरित करावी या मागण्‍यांसदर्भात महाराष्ट्राचे वित्‍त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्‍लीत केंद्रीय पर्यावरण, वन तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेत विस्‍तृत चर्चा केली. या विषयांसंदर्भात त्‍वरित सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन डॉ. हर्षवर्धन यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

पुढे वाचा

पं. दीनदयाल उपाध्‍याय स्‍वस्‍थ महाराष्‍ट्र अभियानाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

गरजू व गरीब रूग्‍णांना त्‍यांच्‍या जिल्‍हयाच्‍या ठिकाणी आवश्‍यक वैद्यकिय सुविधा विनामुल्‍य उपलब्‍ध करून देण्‍यासाठी आज पं. दीनदयाल उपाध्याय स्‍वस्‍थ महाराष्‍ट्र अभियानाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज चंद्रपूर येथील सामान्‍य रूग्‍णालयात या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पहिल्‍या टप्‍प्‍यासाठी १ मे ते 27 मे या कालावधीसाठी सहा जिल्‍हयांची निवड या अभियानाअंतर्गत करण्‍यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्‍हयाचा समावेश असुन या अभियानाअंतर्गत पथदर्शी आरोग्‍यपूर्व तपासणी मोह

पुढे वाचा