आद्य-आराध्य

समर्थांच्या पाऊलखुणा : मुर्खांची लक्षणे

दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी पहिला समास प्रास्ताविक स्वरूपाचा लिहिला आहे...

सुप्रीतिक

बाराव्या दिवशी त्रिगर्त सामोरे आले. त्यांनी आपल्या सैन्याची रचना चंद्रकोरीसारखी केली. अर्जुन एकटाच त्यांच्याशी लढायला आला. त्याचे स्वागत त्रिगर्तांनी बाणांच्या वर्षावाने केले...

प्रभू एक जगी आधार खरा...

भ्रष्टाचार, घोटाळे यांना ऊत आला आहे. अशा कठीण काळात पंढरपूरचा पांडुरंग, चाफळचा प्रभू श्रीराम, तुळजापूरची भवानी माता, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वरचा शंभू महादेव यांच्या दर्शनानं थोडसं बरं वाटतं, साकडं घालून संकटं दूर करण्यासाठी सामान्य लोकं तेथे नतमस्तक होतात...

दासबोध

समर्थवाङ्मय म्हटले की, सामर्थ्याची उपासना, समर्थ तत्त्वज्ञान, समर्थभक्ती आणि सामर्थ्याचे पद्धतशीर संघटन करून तत्कालीन धर्मजागृती यांची आठवण येते. समर्थांनी पुष्कळ वाङ्मय निर्मिती केली असली तरी, त्यापैकी ‘दासबोध’ व ‘मनाचे श्लोक’ हे विशेष लोकप्रिय आहेत. ..

‘स्वाध्याय’ सूर्याचा वियोग

२५ ऑक्टोबर, २००३ रोजी लक्ष्मीपूजनाच्या मंगल मुहूर्तावर पांडुरंगशास्त्री आठवले विदेही झाले. त्यानिमित्ताने.....

द्रोणांचा उद्रेक!

दुर्योधनाला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी द्रोण ११व्या दिवशी एकदमच आक्रमक झाले. युधिष्ठिराला कैद करायचे होते म्हणून त्यांनी निकराची लढाई सुरू केली...

समर्थांची वाङमय निर्मिती

समर्थ रामदासस्वामींनी पुष्कळ वाङ्मयनिर्मिती केली. त्याची थोडक्यात माहिती घ्यायची, तर सोळा स्फुट काव्ये त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ओवीसंख्या सुमारे तीन हजार २०० इतकी भरेल. त्याशिवाय वीस दशकी ‘दासबोधा’च्या सात हजार ७५१ ओव्या आहेत. मनाचे श्लोक २०५ आहेत. ‘आत्माराम’ ग्रंथाच्या १८३ ओव्या आहेत...

बंधमुक्तीचा मार्ग

कर्म करूनदेखील तो अकर्ता असतो. तो जन्माचं सार्थक करून घेतो. त्यामुळे कर्म त्याला बाधक ठरून बंधनात अडकवत नाहीत. अशा जीवाला अभिमान, अहंकार याचा वारा स्पर्श करत नाहीत. तो ज्ञानी भक्त होऊन भगवंताच्या गळ्यातील कौस्तुभमणी होतो. मग त्याला जन्म-मृत्यूचं भय उरत नाही. त्यांची जन्मांच्या कैदेमधून कायमची सुटका होते. ..

मातृभूमीची ओढ अनावर...

आपली भूमी आणि आपली माती याची अनावर ओढ लागली की त्या भूमीला, मातीला स्पर्श करावासा वाटतो. तिथे जाण्यासाठी मन आसुसतं..

आदिशक्तीचं पूजन

मानवाच्या इतिहासात डोकावून बघितलं, तर असं दिसून येतं की, शक्तीची उपासना अतिप्राचीन काळापासून चालू आहे. हजारो, लाखो वर्षांपासून शक्तीला जाणून घेण्यासाठी जे केल जातं ना त्याला ‘उपासना’ म्हणतात. संपूर्ण जगताची शक्ती अफाट, अमर्याद अशी आहे. मानव अशा शक्तीपुढे नतमस्तक होऊन म्हणू लागला...

भीष्म शरपंजरी!

अर्जुनाच्या बाणांनी विद्ध झालेले पितामह भीष्म जवळ जवळ ५८ दिवस शरपंजरी पडले होते! महाभारताचे युद्ध तर केवळ १८ दिवसच लांबले आणि भीष्मांना मात्र ५८ दिवस असं खितपत पडावं लागलं. याची एक कहाणी आहे...

उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप

हिंदू समाजाला सावरायचे, तर त्यांच्यासमवेत हिंदू आदर्श ठेवणे आवश्यक होते. रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे रामदासांचा हाच उद्देश होता की, लोकांना आपल्या आदर्श पराक्रमी पुरुषांची जाणीव होईल. रामराज्य यावे असे त्यांना वाटू लागेल आणि तसा प्रयत्न करणाऱ्या राजाला ते साहाय्यभूत होतील...

उजळावया आलो वाटा...

विवेक जागृत झाला की नश्वरता लक्षात येते. पांडुरंगाच्या भक्तीचा प्रकाश खुणावू लागला. भगवंताच्या भक्तीची गोडी लागली अन् सगळा भार पांडुरंगावर सोपवून ते मोकळे झाले. सामान्य माणूस नैराश्याच्या खोल दलदलीत फसतो. वाट्टेल तसा वागू लागतो. इथेच सामान्य माणूस आणि तुकाराम महाराज यांच्यामधील फरक जाणवतो...

भीष्म आणि राधेय

वृद्ध भीष्मांनी आपल्या या नातवाला पुन्हा पुन्हा जवळ घेतलं. त्याला निरोप दिला. राधेय आपल्या तंबूत परत आला. आता दुर्योधन अजून निद्रेतच होता. राधेयला आपले मन स्वच्छ झाले आहे, असे वाटले. भीष्मांचे आपल्यावरही तितकेच गाढ प्रेम आहे हे कळले म्हणून तो आनंदात होता...

समर्थांचे धारिष्ट...

परकीय सत्तेचा तो जुलमी कालखंड हिंदू देवदेवतांच्या दृष्टीने, हिंदू संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने फार कठीण होता. मुसलमानी अंमलामध्ये मूर्ती स्थापन करणे, देवालये बांधणे, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, देवदेवतांचे सार्वजनिक उत्सव करणे या गोष्टींना मनाई होती. पण, समर्थ मसूरला आल्यानंतर त्यांनी ही बंदी मोडण्यास सुरुवात केली...

जेथ श्रद्धा अन् भक्ती। तेथ होय भगवत् प्राप्ती॥

भक्तीमधून मनाची शक्ती वृद्धीत होते. जीवनाची चंचलता नाहिशी होऊन भगवंताला सारसर्वस्व मानणं म्हणजे भक्ती होय. भक्ती जीवनाला व्यापते आणि चराचराला व्यापणाऱ्या भगवंताला आपलं मानते. रोजच्या दिनचर्येमध्ये भगवंत अग्रस्थानी आला की भक्ती रुजली असे समजायला हरकत नाही...

समर्थांचे गणेशस्तवन

दासबोध ग्रंथ लेखनास सुरुवात करताना त्यांनी प्रथम गणेशाला वंदन केले आहे...

मंगलाचा छंद । तोडी भवबंध ।

बुद्धी प्रदान करणारा श्रीगणेश हा प्रज्ञा, मेधा, ऋतंभरामध्ये वास करतो. संकटांमधून सोडवणारा गणेश भक्तीमध्ये वास करतो. शुभ्र हिमालयाच्या पर्वतराशींत माता पार्वती आणि पिता शंकर यांच्या समवेत वास्तव्य करतो. गणपती भक्तांच्या देवघरातून अंगणात आला. आता तर तो थेट मैदानावर येऊन बसला. ..

कलियुगात सांभाळणारे संत

स्वआचारणामधून स्वाभिमान समाजमनात जागृत करणारे दत्तसंप्रदायामधील श्रेष्ठ संत विष्णुदास महाराज यांच्याविषयी सांगणारा हा लेख... ..

समर्थस्थापित मारुती

हनुमानाच्या अंगी असलेल्या शक्ती, वज्रदेह, युक्ती (बुद्धी) व भक्ती किंवा स्वामीनिष्ठा हे गुण उपास्याच्या अंगी थोडेतरी यावेत. धर्मस्थापनेसाठी हिंदवी स्वराज्यासाठी मारूतीच्या अंगी असलेल्या गुणांची व रणकर्कश आवेशाची जरूरी असते, हे रामदासांना ठाऊक होते...

अन् भीष्म मृत्यूस सामोरे गेले!

अर्जुनाने आपले ओठ घट्ट मिटून घेतले. त्याला हुंदका येत होता. निर्हत्यार आजोबांवर अर्जुनही बाण टाकू लागला. त्याला आपलीच चीड आली होती. लाज वाटत होती. ओल्या डोळ्यांनी तो काहीच पाहू शकत नव्हता. त्यांचा देह बाणांनी भरून गेला...

युद्धाचा सातवा दिवस !

युद्धाचा सातवा दिवस !..

मनगाभारा

मानवाला भगवंतानं ‘मन’ दिल्यामुळे तो इतर योनींपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. मनामध्ये विचारांचा अखंड प्रवाह चालू राहतो. मन एका जागी थांबत नाही. मन वार्‍यापेक्षाही चपळ आहे. एका क्षणात हजारो मैलांचा प्रवास करून परत येतं. या मनाचा थांग लागत नाही. ..

अस्मानी सुलतानी

इ.स.१९३२ च्या एप्रिल महिन्यात तीर्थयात्रेच्या निमित्ताने रामरायाची आज्ञा घेऊन रामदासांनी नाशिक सोडले. काही समर्थ चरित्रकारांच्या मते, रामदासांच्या तपाची बारा वर्षे पूर्ण होताच रामरायांची दृष्टांतात त्यांना आज्ञा झाली की, त्यांनी पायी फिरून, तीर्थयात्रा कराव्या व आपला देश न्याहाळून पाहावा...

श्रीकृष्ण कोपले !

पुढल्या दिवशी भीष्मांनी कौरव सैन्याची रचना ’गरुडहात’ केली, ज्यात चोचीच्या जागी स्वत: भीष्म होते आणि गुरु द्रोण व कृतवर्मा हे गरुडाचे दोन डोळे होते. अश्‍वत्थामा व कृप हे गरुडाच्या डोक्यापाशी होते. त्रिगर्त आणि जयद्रथ सैन्यासह मानेत सरसावले होते. मध्यभागी हृदयापाशी दुर्योधन, विंद, अनुविंद होते. तर शेपटीकडे कोसलराजा बृहद्बळ प्रचंड सैन्य घेऊन सज्ज होते...

जीवाचा अखंड प्रवास

सृष्टीमध्ये अशी व्यवस्था असते की, माणसाला देह टाकून, मृत्यूला सामोरं जावं लागतं. देह अनेक कारणानं सोडून द्यावा लागतो. भगवद्‍गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला आहे...

दिवस दुसरा !

आजचे युद्ध अधिक भीषण असे होते. युद्धभूमी रक्ताच्या पाटाने रंगीत झाली होती. सर्वत्र माणसे, घोडे आणि हत्ती यांचे मृतदेह विखुरले होते. ..

अलौकिक अनाहत नाद...

पंचमहाभूतांचा प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळा आहे. आकाश तत्त्वाचा ‘शब्द’ हा धर्म आहे. ‘ॐ’ हा पहिला शब्द! ॐकारामधून अनेक शब्द तयार झाले ॐकारामधून येणारा नाद अंतर्मनापर्यंत पोहोचतो. त्याची कंपने... स्पंदने जाणवतात. त्यामध्ये शक्ती आहे. ..

संत रामदास स्वामी आणि चमत्कार

संत आणि चमत्कारांचं नातं जवळचं आहे. प्रत्येक संताच्या नावावर काही ना काहीतरी चमत्कार सांगण्यात येतात, पण चमत्कार हे संतांचे व्यवच्छेदक लक्षण मानता येत नाही. ख्रिस्ती धर्मात ‘संत’ पदवी मिळवण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावर काही चमत्कार असावे लागतात. तसे हिंदू धर्मात नाही...

अन् युद्ध सुरु झाले...

कौरवांनीच युद्धाला सुरुवात केली. कौरवांचे सेनापती भीष्म आघाडीवर होते. दु:शासन पांडवांच्या सैन्याकडे निघाला. धृष्टद्युम्न आणि पांडव यांनी त्यांच्या हल्ल्यास विरोध केला, अतिशय भयानक दृश्य होते ते! सगळीकडून कानठळ्या बसतील असे आवाज येत होते. मोकाट सुटलेला सिंह जसा डरकाळ्या फोडतो, तशा आवाजात भीमगर्जना करत होता...

भगवद्‍गीता भाग - ३

अर्जुना, मी आणि तू पण अनेक जन्म घेतले आहेत. मला ते सर्व आठवत आहेत, तू मात्र विसरलास. मी अजन्मा आणि शाश्वत आहे. ..

गुरू आत्माराम

‘जन स्वभाव गोसावी’ या त्यांनी लिहिलेल्या प्रकरणात त्यांनी भोंदू साधूंवर टीका केली आहे. ‘यत्न तो देव जाणावा’ ही त्यांची उक्ती प्रसिद्ध आहे...

रुद्राक्ष - भक्ती... शक्ती... मुक्तीदाता

‘रुद्र’ हे शिवाचं नाव तर ‘अक्ष’ म्हणजे डोळा! शिवाची भक्ती करणारे रुद्राक्षाला शुभ मानतात. काशी क्षेत्री भगवान शंकर-शिवभक्तांना-उपासकांना ज्ञान आणि मोक्ष प्रदान करतात...

एकाजनार्दनी दत्त | वसे माझ्या हृदयांत।।

जनार्दन स्वामी हे थोर दत्तोपासक होते. यवन राजवटीमध्ये राहून ते आपली दत्तभक्ती करत होते. देवगिरीवर ते मोठ्या पदावर काम करत होते...

भगवद्गीता

कृष्णाने अर्जुनाचा रथ सैन्याच्या पुढे आणला. त्याच्या ध्वजावर हनुमान विराजित होते. धृतराष्ट्रपुत्र आणि पितामह भीष्मांनी रचलेला सेनाव्यूह त्याला दिसला. ..

समर्थ रामदासांची ध्येयनिश्चिती

संत रामदास स्वामींचे चरित्र ढोबळमानाने सर्व मराठी घरांतून माहीत असते. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर. स्वतःच्या लग्नसमारंभातून पुरोहितांनी ‘सावधान’ म्हणताच रामदास पळाले. त्यावेळी रामदासांचे म्हणजेच नारायणाचे वय अकरा वर्षांचे होते. त्यांच्या या कृतीवर, तसेच इतर अनेक बाबतीत आक्षेप घेण्यात आले. ..

समर्थ रामदास - टीका आणि टीकाकार

समर्थ रामदासांनी नि:स्पृह महंत तयार करुन, त्यांना दूरवर पाठवून दिले होते. सत्ता म्लेंच्छांची असली, तरी या महंतांना आपली धार्मिक कृत्ये सांभाळून, समाज प्रबोधनाचे काम करावे लागे. ..

निसर्गाचं अलौकिक सामर्थ्य

निसर्ग संवाद साधणारा आहे. पशू, पक्षी आणि मानवाशी संवाद साधून, मैत्रीचा हात पुढे करतो. अनेक जीवांना जीवदान देतो. निसर्ग सकल सृष्टीला सजग करतो...

समर्थ रामदास आणि आम्ही...

समर्थ रामदास स्वामींसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि सतराव्या शतकात धार्मिकक्षेत्र, राजकारण, समाज संघटन, पारमार्थिक विचारांची वाङ्‌मय निर्मिती इत्यादी बाबतींत कायमचा ठसा उमटवून गेले यात शंका नाही...

ज्येष्ठांना मान!

रणभूमीवर अचानक शांतता पसरली. कारण सर्वांचे लक्ष युधिष्ठिराकडे लागले होते. त्याने आपले चिलखत आणि आयुधे उतरवली आणि अनवाणी पायांनी तो कौरवांच्या सैन्य तळाकडे चालू लागला. ..

वाणीचं वरदान...

भगवंतानं मानवाला वाणी प्रदान केली आहे. वाणीद्वारे एकमेकांशी संवाद साधला जातो. या वाणीचे चार प्रकार आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. अशा वाणीच्या प्रकारांमधून भक्ती आकाराला येते. ..

महाभारतातील दिव्य अस्त्रे

मागील लेखात आपण सेना आणि व्यूहरचना यांविषयी थोडी माहिती घेतली. आता कुरुक्षेत्रावर वापरात आलेल्या अनेक अस्त्रांपैकी काही महत्त्वाच्या अस्त्रांविषयी माहिती घेऊया...

‘सकळ त्याजुनि भावें कास तुझी धरावी’

समाजाला सुसंस्कृत ठेवण्यासाठी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत चालणार्‍या रामायणाची, रामपाठाची आहे. मरगळलेल्या मनाला भरकटलेल्या लोकांना सुपंथावर, सन्मार्गावर आणून संजीवनी प्रदान करणारं प्रभू श्रीरामाचं चरित्र आहे. ..

युद्धभूमी

कुरूक्षेत्रावर पांडवांनी पश्चिमेला तळ ठोकला, तर कौरव सैन्य भीष्मांच्या अधिपत्याखाली पूर्वेच्या बाजूस होते. अगदी पहाटे पहाटे पांडवांना कौरवांच्या सैन्यात पांढरीशुभ्र छत्री दिसली. ..

संतकृपाप्राप्त भाग्यशाली समाज

समाजामध्ये सहकार्याची भावना असणं आवश्यक आहे. एकमेकांना मदत करणं, साहाय्य करण गरजेचं आहे. समाजात अनेक व्याधींनी ग्रस्त आणि त्यामुळे त्रस्त असणारी माणसं आहेत...