आकाशाशी जडले नाते

योगिनी पृथ्वी

सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि चैतन्यपूर्ण ग्रह म्हणजे पृथ्वी! या अप्रतिम ग्रहाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रापेक्षा योग्य ठिकाण कोणते असू शकते? तर, आज चंद्रावरून पृथ्वीचे दर्शन घेऊ ..

आकाशाशी जडले नाते - पृथ्वीप्रकाश

पृथ्वीवर जशा चंद्राच्या कला दिसतात, तशाच पृथ्वीच्या पण कला चंद्रावरून दिसतात. पृथ्वीची कला, पृथ्वीवरील ढगांचे आवरण, बर्फाचे अच्छादन, नद्या व सरोवरातील पाणीसाठा यांमुळे तिचा प्रवर्तित होणारा प्रकाश कमी-अधिक होतो.”, आबा म्हणाले...

आकाशाशी जडले नाते - वंदे मातरम्

“सुमित अरे, शेवटी काही झाले तरी ती ‘आई’ आहे! सर्वात श्रेष्ठ देवता आहे! अनादी काळापासून, केवळ मानवातच नाही तर सर्व प्राणीमात्रात आई सारखे दैवत आहे का सांग बरे?”, आबांनी विचारले...

आकाशाशी जडले नाते - आकाशातला बाप

चला, आज एका लांबच लांब सफरीला जाऊ! खूप खूप वर्षांपूर्वी, ऋग्वेदाच्याही पूर्वीच्या काळात जाऊ! तेंव्हा पासूनच्या आकाश देवांची परंपरा पाहू...

आकाशाशी जडले नाते - डीझाईनर आकाश

“पुरे! पुरे हं! उगीच काहीतरी समज करून घेऊ नका! आता सुमित आला आहे, तर दाखवा बरे तुमचे काय ते डीझाईनस् चे नमुने!”, न राहवून दुर्गाबाई म्हणाल्या...

एक उलट एक सुलट

आबांनी दोन फोटो दाखवले. दुर्गाबाईंची नक्कल करत म्हणाले, “दक्षिण गोलार्धातून उलट, उत्तर गोलार्धातून सुलट. एक उलट, एक सुलट!”..

आकाशाशी जडले नाते - रामचंद्र

चंद्रोदयाच्या वेळेचं एक आखीव रेखीव गणित आहे. चंद्राच्या उगवायच्या वेळा तिथी प्रमाणे ठरलेल्या असतात. म्हणजे कसे ते बघा....

आकाशाशी जडले नाते - ताराग्रहण

हा occult रात्रीच्या आकाशात घडायला हवा, कारण सूर्या जवळ घडला तर प्रखर प्रकाशात दिसत नाही. ..

आकाशाशी जडले नाते - छायागीत

चंद्राशिवाय ग्रहण आणणारे आणखी काही ग्रह आहेत आपल्या आकाशात! ग्रहण म्हणजे काय सुमित, तर एका ग्रहाची सावली दुसऱ्या ग्रहावर पडणे. बरोबर?..

आकाशाशी जडले नाते - लपंडाव

“आबा, गुरुवर जर सारखी सारखी सूर्य ग्रहणे होतात, तशी चंद्र ग्रहणे पण होत असतील ना?”, सुमितने विचारले...

पाळता भुई थोडी!

आपण पाहणार आहोत गुरुवर पडणारी गुरूच्या चंद्राची सावली! म्हणजे गुरु ग्रहावर घडणारे सूर्यग्रहण आपण पृथ्वी वरून पाहणार आहोत..

लहान माझी भावली मोठी तिची सावली!

चंद्राची सावली अर्थातच पृथ्वीपेक्षा लहान आहे. त्यामुळे ती पृथ्वीचा लहानसा भाग व्यापते. केवळ तेवढ्या भागातच सूर्यग्रहण दिसते...

महाशिवरात्र

पण आबा, Winter Solstice तर २१ / २२ डिसेंबरला होऊन गेला. आता तर फेब्रूवारी महिना आहे. मग महाशिवरात्र इतक्या उशिराने कशी काय?”, सुमितने विचारले...

हा खेळ सावल्यांचा

३१ तारखेचे चंद्रग्रहण त्या भल्या मोठ्या सावलीचा खेळ आहे! चंद्र त्या सावलीतून प्रवास करता करता काही काळापुरता गायब होणार आहे!..

राहू आणि केतू

सुमित, आजची गोष्ट आहे पुराणातली. आकाशाची, सूर्याची आणि चंद्राची! तुझ्या ओळखीची समुद्र मंथनाची गोष्ट आहे...

इक बंगला बने न्यारा!

“पण आबा, पृथ्वीवरून कुठूनही चंद्र दिसतो, तसे चंद्रावरून पण कुठूनही पृथ्वी दिसणारच ना?”, सुमित म्हणाला. ..

चंद्राचे उत्तरायण व दक्षिणायन

पृथ्वीवरून निरीक्षण करतांना असे दिसते की सूर्य आकाशात ठराविक मार्गात फिरतो. सूर्याला या मार्गाची फेरी पूर्ण करायला एक वर्ष लागते. हा मार्ग पृथ्वीच्या इक्वेटोरियल प्लेनला (Equatorial plane) २३ अंश कलला आहे...

आकाशाशी जडले नाते – महानीलचंद्र

“सुम्या, या महिन्यात आवर्जून बघायची घटना असेल ३१ जानेवारीला. या दिवशी महा नील चंद्र लाल रंगाचा होतांना दिसणार आहे!”, आबा म्हणाले...

आकाशाशी जडले नाते – चंद्रकोरीचा धर्म

आज आपण Space Travellers होऊ. आज आपण एकाच वेळी विविध ठिकाणांहून चंद्रकोर कशी दिसते ते पाहू.”, आबा म्हणाले...

आकाशाशी जडले नाते – सोमरसपान

तर आज आपण चंद्राच्या कला पाहू. पहिली गोष्ट अशी की - पृथ्वी सूर्या भोवती फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. पण सध्या आपण फक्त चंद्राचे पृथ्वी भोवती फिरणे विचारात घेऊ...

आकाशाशी जडले नाते - ब्रह्मा विष्णु महेश

“ओह नो!! प्रजापती मरतो? अशी कशी गोष्ट? मग यज्ञ, वर्ष कसे चालणार?”, सुमितने विचारले. पाहूयात पुढे काय होतं ते ... ..

आकाशाशी जडले नाते - प्रजापती

प्रजोत्पत्ती करणारा तो प्रजापती, या प्रमाणाने, ही सर्व मंडळी दक्ष प्रजापतीची प्रजा होती. कालांतराने या प्रजेत २ मोठे गट तयार झाले – देव आणि असुर...

एका यज्ञाची गोष्ट

“श्रौत यज्ञांपैकी ‘हविर्यज्ञ’ हे मात्र छोटेखानी यज्ञ होते. हे आजन्म, नियमितपणे व घरोघरी केले जात असत. या यज्ञात दुध, तूप, पुरोडाश, आदी हवी अर्पण करत असत.”, आबा सांगत होते...

आकाशाशी जडले नाते : जपानची सूर्यपूजा

सुमितने आजीला नमस्कार करून तिच्या हातात एक सुंदरसा जपानी पंखा ठेवला. दुर्गाबाईनी अलगद पंखा उघडला त्याबरोबर त्यावर गुलाबी रंगाची चेरी फुले उमलली. आणि पूर्ण उघडल्यावर त्याचा एक मोठा गोल झाला. दुर्गाबाई त्यावरील बारीक नक्षी पाहून हरकून गेल्या, तसे आबा म्हणाले, “दुर्गे, तो पंखा अंबाड्यात खोचालास न, की तुला एक छानशी प्रभावळ येईल बघ! आणि तू खरोखरी दुर्गामाते सारखी दिसशील!”..