पुणे

तृतीय वेद विज्ञान संमेलन १० जानेवारी पासून

विज्ञान भारती आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १० जानेवारी २०१८ ते १३ जानेवारी २०१८ या दरम्यान ‘तृतीय विश्व वेद विज्ञान संमेलन’ डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात येत आहे. भारतीय वेद शास्त्राचे विज्ञानाच्या क्षेत्रात असलेले योगदान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वैज्ञानिक विजय भटकर यांनी दिली. वेद विज्ञान संमेलनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काल ते बोलत होते.

पुढे वाचा

मर्ढेकरांचे स्मारक व कवितेचे गाव साकारण्यास वेग मिळणार?

मराठी साहित्यात विशेषतः कवितेत आधुनिक प्रवाह रुढ करणारे सातारा जिल्ह्यातील बा.सी.मर्ढेकरांच्या स्मारकाविषयी अनेक वर्षे प्रलंबित मागणीला महाराष्ट्र शासनाने प्रतिसाद दिल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. साताऱ्यात फेब्रुवारी महिन्यात भिलार या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळख मिळाल्यावर त्याआधी प्रस्तावित असलेली मागणी पूर्ण व्हावी यासाठी मसापच्या सातारा शाखेने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. आता मर्ढेकरांचे मूळ गाव मर्ढे कवितेचे गाव म्हणून साकारण्यास वेग मिळेल अशी आशा साहित्यिक

पुढे वाचा

ईशान्य भारताच्या राज्यांनी अभिमान बाळगावा : डी.बी. शेकटकर

ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी स्वतःला दुर्बल समजू नये, तुमच्यापैकीच कोणी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, सनदी अधिकारी किंवा शहराचा पोलीस कमिशनर होऊ शकतो, अशा शब्दात निवृत्त ले.जनरल. डी. बी. शेकटकर यांनी उपस्थित पुर्वांचालाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. माय होम इंडिया सा संस्थेतर्फे आयोजित नेस्ट फेस्ट २०१७ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक, माय होम इंडियाच्या उपाध्यक्षा पूर्णिमा मेहता व सचिव विनय पांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे वाचा

भारतीय व्यक्ती कुठेही गेला तरी भारताची परंपरा सोबत नेतो : तरुण विजय

एक भारतीय व्यक्ती कुठेही गेला तरी भारताची परंपरा आपल्या सोबत घेवून जातो. त्या संस्कारांमुळेच त्या परंपरेमुळेच त्याला एक भारतीय म्हणून सगळे ओळखतात, आणि त्यामुळेच तो जगातील सुंदर अनुभव प्रवासादरम्यान घेवू शकतो. आशीष गोरे यांच्या पुस्तकातील याच संस्कारांचे दर्शन होते. त्यामुळेच चीनच्या एका अनोळखी शेतकऱ्याने त्यांचे अगत्याने स्वागत केले. अशा भावना ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार तरुण विजय यांनी व्यक्त केल्या. प्रसिद्ध स्तंभलेखक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या पदावर असलेल्या आशीष गोरे यांच्य

पुढे वाचा

पुण्यातून ज्ञानोबा -तुकारामांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ

'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रात घुमतोय. त्याला कारणही तसेच आहे. विठ्ठल भक्तांची वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. काल अभंग आणि भजनांच्या गजराने संपूर्ण पुणे नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती. त्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी काल पुण्यात मुक्काम केल्यानंतर आज या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर श्री विठ्ठल मंदिर येथे तर ज्ञानेश्वरांची पालखी सासवड येथे मुक्काम करणार आहे.

पुढे वाचा