Advertisement

आंतरराष्ट्रीय

मोसूल येथील प्रसिद्ध मशिद इसिसने उडवली

पुढे पहा

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेने मोसुलमधील अल-नुरी मशिद स्फोट घडवून उडवली आहे. ..

ट्रम्प यांचे निकटवर्तीय केनेथ जेस्टर होणार अमेरिकेचे भारतातील राजदूत

पुढे पहा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय केनेथ जेस्टर यांची अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे...

युरोपला शेतमाल निर्यात करण्यात भारत जगात १० व्या क्रमांकावर

पुढे पहा

पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा क्रमांक असून दहाव्या क्रमांकावरील भारताने एप्रिल २०१७ पर्यंत ३०३ दशलक्ष युरोंचा व्यापार केल्याची माहिती दिली आहे...

'पाकिस्तान अरबांचा गुलाम आहे' - मोहम्मद बिन सलमान

पुढे पहा

पाकिस्तान हा अरबांचा गुलाम आहे' असे विधान सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री तसेच नव्याने युवराज घोषित करण्यात आलेले मोहम्मद बिन सलमान यांनी केले आहे. मोहम्मद बिन सलमान यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्ताना आणि सौदी यांच्या संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...

जगभरात योगदिन दिमाखात साजरा

पुढे पहा

आज २१ जून म्हणजेच जागतिक योग दिवस. संपूर्ण जगात हा दिवस आज सकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. लंडन येथे 'ट्राफालगर स्वेअर' येथे अनेक योगसाधक हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. तर चीन येथे 'ग्रेट वॉल ऑफ चायना' येथे हजारोंच्या संख्येत चीनी नागरिकांनी 'ग्रेट वॉल ऑफ योगा' तयार केली. हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. भारताच्या प्रसिद्ध आयएनएस शिवालिकच्या डेक वर देखील नौदलाच्या सैनिकांनी योगदिन साजरा केला...

तालिबानच्या हल्ल्यात ८ अफगाण सैनिक ठार

पुढे पहा

काल रात्री बेगराम येथील हवाई तळावर हे सैनिक जात असताना वाटेत त्यांच्यावर तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैनिकांची गाडी वाटेत अडवून त्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये ८ जवान शहीद झाले तर ५ जण जखमी झाले. ..

संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या इमारतीवर झळकले योग

पुढे पहा

संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या इमारतीवर २१ जुलै या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने ‘योग’ झळकले आहेत. ..

चॅम्पियन्स ट्रॅाफी जिंकल्यानंतर पाकिस्तान पोहचले ‘या’ स्थानावर

पुढे पहा

चॅम्पियन्स ट्रॉफी हारल्यानंतर भारताला त्याचा फटका बसला का किंवा पाकिस्तानला काय फायदा झाला, हे जाणून घेण्यासाठी वाचा खालील वृत्त...

'योग दिना'च्या रोषणाईने उजळले संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय

पुढे पहा

प्रसिद्ध सिनेअभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते या रोषणाईचे आज उद्घाटन करण्यात आले. यंदा योग दिनाचे हे तिसरे वर्ष आहे. त्यामुळे भारतासह जगभरात योग दिनानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळत आहे...

हाफिज सईदच्या नजरकैदेवर ३ जुलैला सुनावणी

पुढे पहा

लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल सामी खान यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यांच्या खंडपीठासमोर हाफिज सईदच्या प्रकरणावर सुनावणी करत आहेत. या प्रकरणावर आज सुनावणी करण्यात येणार होती. परंतु या प्रकरणी डिप्टी अटॉर्नी जनरल न्यायालयात हजर नसल्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे सईदच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे...

पोर्तुगाल येथील वणव्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ

पुढे पहा

काल पोर्तुगाल येथे वणवा पेटल्यानो पोर्तुगालवर मोठे संकट उद्भवले आहे. पोर्तुगाल येथील पेड्रोगन ग्रैंड या जंगलात वणवा पेटल्याने ६० नागरिक ठार झाल्याची घटना घडली आहे. याव्यतिरिक्त ५० लोक जखमी झाले आहेत. १८ लोक कारमध्ये बसले असतानाच जळाले आणि मृत्यूमुखी पडले. अनेक लोक बेघर झाले आहेत. या घडलेल्या भीषण घटनेमुळे पोर्तुगाल सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे...

'काश्मीरच्या मदतीला या'- अब्दुल मक्कीचे पाकिस्तानी पत्रकारांना आवाहन

पुढे पहा

पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे जमात-उद-दावाकडून पत्रकारांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मक्कीने उपस्थित पत्रकारांना अत्यंत केविलवाण्या स्वरात काश्मीर प्रश्नी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे...

रशिद लतिफने भेजा हैं मोहब्बत का पैगाम... पाकिस्तानच्या विजयानंतरचा लतिफचा व्हिडिओ होतोय व्हायरल

पुढे पहा

पाकिस्तानने अंतिम सामना जिंकल्यानंतर सेहवाग-लतिफ यांच्यातील वादावर लतिफने नेमका कोणता संदेश पाठवलाय ते पाहा.....

लंडनमध्ये भरधाव ट्रकने ८ जणांना चिरडले

पुढे पहा

ब्रिटेनच्या स्थानिक वेळेनुसार काल मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी ही घटना घडली. फिल्सबेरी पार्क जवळील सेव्हन सिस्टर्स रोडजवळ असलेल्या एका मशिदीबाहेर या माथेफिरूने नागरिकांना ट्रक खाली चिरडले...

आता चीनही आंतरराष्ट्रीय योगदिनात सहभागी होणार

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला आणि त्यानंतर संपूर्ण जगाला या दिवसाचे महत्व पटले. या वर्षी संपूर्ण जगभरातून आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये आता चीन देखील सहभागी होणार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय योगा दिनाला विशेष महत्त्व प्राप्त होईल...

पोर्तुगाल येथील वणव्यात २४ ठार

पुढे पहा

पोर्तुगाल येथील जंगलामध्ये वणवा पेटल्याने २४ नागरिक ठार झाल्याची घटना घडली आहे. तसेच यामध्ये २० हून अधिक नागरिक भाजल्याची शक्यता आहे. अशी माहिती पोर्तुगाल पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. पेड्रोगन ग्रैंड या जंगलात काल अचानक वणवा पेटला. तसेच अगदी कमी वेळात हा वणवा संपूर्ण जंगलात पसरला. यामुळे अनेक नागरिक त्यांच्या कार मध्ये बसले असतानाच जळाले आणि मृत्युमुखी पडले...

इंडोनेशिया ओपन : एच.एस.प्रणय पराभूत, श्रीकांत विजयी

पुढे पहा

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या ‘इंडोनेशिया ओपन सुपरसिरीज’च्या उपांत्य फेरीत भारताचा स्टार बॅटमिंटनपटू एच.एस. प्रणय याला आज पराभवाला सामोरे जावे लागले आहे...

इसिसचा सुरक्षा प्रमुख सुलेमान अल शौनकचा रशियन आर्मीकडून खात्मा

पुढे पहा

आज रशियाच्या संरक्षण विभागाने जाहिर केलेल्या माहितीनुसार रशियन आर्मीने सीरियामध्ये केलेल्या लष्करी कारवाईत इसिसचा सुरक्षा प्रमुख सुलेमान अल शौनक मारला गेला आहे...

अरुण जेटली यांनी मून जई इन यांची घेतली भेट

पुढे पहा

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोरियाचे राष्ट्रपती मून जई इन यांची भेट घेतली. अरुण जेटली भारत-कोरिया व्यापार बैठकीत भाग घेण्यासाठी कोरियाच्या दौऱ्यावर गेले असता या बैठकीदरम्यान त्यांनी मून जई इन यांची भेट घेतली...

नीरू चड्ढा ITLOS च्या पहिल्या भारतीय महिला सदस्य

पुढे पहा

आंतरराष्ट्रीय कायदे तज्ज्ञ नीरू चड्ढा यांची इंटरनॅशनल ट्रिब्युनल ऑर द लॉ ऑफ द सी अर्थात ITLOS ची पहिली भारतीय महिला सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे...

चीनच्या बालवाडीत स्फोट, ८ ठार

पुढे पहा

चीनच्या जियांगसू येथील फेंगजियांग येथे एका बालवाडीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ८ लोक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक वेळेनुसार काय सांयकाळी सुमारे ४.३० वाजता बालवाडीच्या मुख्य दरवाज्यावर अचानक स्फोट झाला. तिथे उपस्थित असलेले ८ लोक जागीच ठार झाले तर ५९ नागरिक जखमी झाले आहेत. ..

चॅम्पियन्स ट्रॉफी: भारतापुढे २६५ धावांचे आव्हान

पुढे पहा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीतील आजचा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. लंडन येथील एजबेस्टन मैदानावर हा सामना खेळवला जात असून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. ..

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाकिस्तानात गळचेपी

पुढे पहा

३० वर्षीय तैमुर रझा या तरुणाने सोशल मिडियात केलेल्या पोस्टमुळे दहशतवाद विरोधी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ..

लंडन आग : १०व्या मजल्यावरुन फेकल्यानंतरही बाळ जीवंत

पुढे पहा

लंडनमधील लँचेस्टर येथील केन्सिंगटन या २४ मजली इमारतीला परवा मध्यरात्री भीषण आग लागली होती. संपूर्ण इमारत या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे ६८ नागरिक होरपळले गेले आहेत. मात्र या आगीत देखील एक चिमुकला जीव १०व्या मजल्यावरुन खाली फेकला गेल्यानंतरही सुखरूप आहे. ..

सॅन फ्रॅन्सिस्को येथील गोदामात गोळीबार, ४ ठार

पुढे पहा

अमेरिकी पार्सल कंपनी यूपीएसच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथील गोदामात एका माथेफिरुने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेच माथेफिरूसह ४ लोक ठार झाली आहेत. माथेफिरूने दोन नागरिकांना गोळी मारुन ठार केले आणि एकाला जखमी केले, ज्याचा नंतर मृत्यु झाला. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही...

व्यापार, गुंतवणूक वाढीसाठी भारत-द.कोरियात सहमती

पुढे पहा

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विकास आणि व्दिपक्षीय व्यापार यांना चालना देण्यासाठी सहमत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. ..

लंडनमधील इमारतीच्या आगीमुळे १८ लोक गंभीर अवस्थेत

पुढे पहा

लंडनमधील लँचेस्टर येथील केन्सिंगटन या २४ मजली इमारतीला काल मध्यरात्री भीषण आग लागली होती. संपूर्ण इमारत या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे ६८ नागरिक होरपळले गेले आहेत. त्यातील १६ लोक गंभीर अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे...

लंडनमध्ये राहत्या इमारतीला भीषण आग

पुढे पहा

लंडनमधील लँचेस्टर येथील एका २३ मजली इमारतीला काल मध्यरात्री भीषण आग लागली आहे. संपूर्ण इमारत या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. ..

माल्ल्याची भारतीय प्रसारमाध्यमांवर आगपाखड

पुढे पहा

भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याने भारतीय प्रसारमध्यमांवर आगपाखड केली आहे. भारतीय प्रसारमाध्यमे माझ्याविरोधात भारतीयांमध्ये प्रखर व्देष निर्माण करत असून त्याला काहीच सीमा राहीली नाही असे माल्ल्याने आपल्या व्टिटर अकाऊंटच्या माध्यमातून म्हटले आहे. ..

फोर्ब्सच्या श्रीमंत यादीत भारतीय नावांचा देखील समावेश

पुढे पहा

फोर्ब्सने २०१७ ची सगळ्यात श्रीमंत कलाकारांची यादी घोषित केली आहे. यात भारतीय नावांचा देखील समावेश झाला असून यामध्ये भारताच्या तीन दिग्गज कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. ..

म्युनिख येथील रेल्वे स्टेशनवर गोळीबार

पुढे पहा

आज दुपारी हा माथेफिरू म्युनिक शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या एका भुयारी रेल्वे स्थानकावर हातात बंदूक घेऊन आला होता. त्यानंतर त्याने स्टेशनवर रेल्वेची वाट पाहत असलेल्या प्रवाशांवर अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली...

बांग्लादेशात भूस्खालनामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू

पुढे पहा

बांग्लादेशातील बंदरबन येथील कालाघाट आणि लेमुजीरी या दोन्ही ठिकाणी काल या घटना घडल्या. देशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री या दोन्ही ठिकाणी लागोपाठ भूस्खलन झाले. ..

विजय माल्यावर आज लंडन न्यायालयात सुनावणी

पुढे पहा

भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्यावर आज लंडनमधील न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. ..

ग्रीकमध्ये भूकंप, १० नागरिकांचा मृत्यू

पुढे पहा

ग्रीकमध्ये काल झालेल्या भूकंपामध्ये १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मध्यम तीव्रतेच्या या भुकंपामुळे शेकडो नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. ..

२५ व २६ जून रोजी ट्रम्प - मोदी भेट निश्चित

पुढे पहा

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ही पहिलीच भेट ठरणार आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे...

काश्मीर प्रश्नी रशियाचा पाकिस्तानला पाठींबा ?

पुढे पहा

काश्मीर प्रश्नी रशियाने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे. परंतु परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर छापलेल्या नकाशामध्ये काश्मीरचा भाग हा अधिकृतपणे पाकिस्तानमध्ये भारताचा ..

इराणने पाठवली कतारला मदत

पुढे पहा

'जो पर्यंत कतार संकटमध्ये आहे. तोपर्यंत इराण त्याच्या मदतीला सदैव तत्पर असेल. कतारला लागेल त्या वस्तूची मदत इराणकडून केली जाईल. सध्या ५ विमानांमध्ये प्रत्येकी ९० टन असा अन्न साठा कतारला पाठवला आहे. तसेच लवकरच आणखी ३५० टन अन्नसाठा जहाजामार्फत कतारकडे रवाना करण्यात येणार आहे' अशी माहिती इराण एअरवेअसचे प्रवक्ते शाहरोख नुशराबादी यांनी दिली आ..

कॉंगो येथील तुरुंगावर हल्ला, ११ कैदी ठार तर ९०० फरार

पुढे पहा

या हल्ल्यानंतर कोंगो येथील तुरुंगातील ९६६ कैद्यांपैकी ३० कैदीच तुरुंगात राहिले असल्याही माहिती किवो प्रांताचे गव्हर्नर जूलीयन पलामू यांनी दिली...

आता ऑस्ट्रियामध्येही 'बुरखा' घालण्यावर बंदी

पुढे पहा

१ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रियामध्ये बुरखा घालणे हा कायदेशीररित्या गुन्हा ठरणार आहे. तसेच हा कायदा मोडणाऱ्यांकडून १५० युरो म्हणजेच १० हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात येणार आहे. ..

वर्णद्वेषातून भारतीयांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अटक

पुढे पहा

वॉशिंगटनच्या कंसास येथील एका बारमध्ये वर्णद्वेषातून भारतीयांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अखेर अटक झाली आहे. कंसास येथे दोन भारतीयांवर गोळीबार करणाऱ्या अॅडम प्युरिंटोन याला दोषी ठरवण्यात आले आहे...

थेरेसा मे यांच्या निकटवर्तीयांचा राजीनामा

पुढे पहा

निक टिमोथी आणि फियोना हिल असे या दोन्ही सहकाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे मे यांचे प्रमुख सल्लागार होते. मे यांच्या काही धाडसी निर्णय आणि लोकप्रियतेमुळे देशात मध्यवर्ती निवडणुका घेतल्यास त्यांचा पक्षाला मोठा फायदा होईल असा सल्ला यांनीच मे यांना दिला होता. ..

मंगळ मोहिमेसाठी ‘नासा’ची तयारी

पुढे पहा

नासा नेहमीच मंगळ मोहिमेसाठी नव नवे प्रयोग करीत असतो. मात्र यावेळी नासाने मंगळ ग्रहावर संशोधन करण्यासाठी चार अंतराळ वीरांचा एक संघ तयार केला आहे. ..

‘एससीओ’मधील सहभागाला भारताची प्राथमिकता - नरेंद्र मोदी

पुढे पहा

कझाकिस्तानची राजधानी 'अस्ताना' येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’मध्ये मिळालेल्या सहभागाला भारत प्राथमिकता देतो तसेच ते या बैठकीचे पूर्णपणे समर्थन करतात असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ..

ब्रिटनमध्ये थेरेसा मे यांना मोठा झटका, बहुमतापासून दूर

पुढे पहा

ब्रिटन येथे सुरु असलेल्या पंतप्रधान पदासाठीच्या मध्यावधी निवडणुकीत थेरेसा मे यांना मोठा झटका बसला आहे. काल झालेल्या मतदानानंतर आज सुरु असलेल्या निकाल प्रक्रियेत आता पर्यंतमिळालेल्या माहितीनुसार थेरेसा मे यांच्या कझर्वेटिव्ह पक्षाला सगळ्यात अधिक मतं जरी मिळाली असलीत तरी त्यांचा पक्ष बहुमताचा आकडा गाठू शकलेला नाही. त्यामुळे त्रिशंकू सरकार निर्माण होण्याची शक्यता आहे. ..

अस्ताना येथे मोदींनी घेतली विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शांघाय सहयोग शिखर परिषद अर्थात एससीओत सहभागी होण्यासाठी कझाकिस्तानला गेले असून आज अस्ताना येथे त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग यांची भेट घेतली...

जेम्स कोमी यांचे डोनाल्ड टॅम्प यांच्यावर आरोप

पुढे पहा

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे निलंबित केलेले निर्देशक जेम्स कोमी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप केले आहेत. ..

पंतप्रधान मोदी शांघाय सहयोग शिखर परिषदेला आज संबोधित करणार

पुढे पहा

शांघाय सहयोग शिखर परिषद अर्थात एससीओ कझाकस्तान मधील अस्ताना येथे आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेला संबोधित करणार आहेत...

फ्रेंच ओपन २०१७- बोपन्ना आणि ग्रब्रिएलाने पटकावले विजेतेपद

पुढे पहा

फ्रेंच येथील रोलँड गॅरोस मैदानावर सुरु असलेली फ्रेंच ओपन २०१७ चे मिश्र दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद भारताचा स्टार खेळाडू रोहन बोपन्ना आणि कॅनडाची टेनिसपटू ग्रब्रिएला डाब्रोवस्की यांनी पटकावले आहे. ..

नरेंद्र मोदी यांनी नूरसुल्तान नज़ारबायेव यांची घेतली भेट

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय कझाकिस्थानच्या दौऱ्यावर गेले असतांना आजच्या दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्यात त्यांनी कझाकिस्थानचे राष्ट्रपती नूरसुल्तान नज़ारबायेव यांची भेट घेतली. ..

कुलभूषण जाधव प्रकरणावर आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात चर्चा

पुढे पहा

भारतीय वायुदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात चर्चा केली जाणार आहे. जाधव प्रकरणावर सुनावणी करत असलेल्या खंडपीठाचे प्रमुख रॉनी अब्राहम यांच्या उपस्थितीत ही चर्चा होणार आहे...

म्यानमारच्या सैनिकी विमानाला अपघात

पुढे पहा

काल सकाळी म्यानमार लष्कराच्या वाय-८ एफ-२०० या विमानाने मायीकहून यांगूनसाठी उड्डाण केले होते. यानंतर दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी विमानाचा लष्कराशी असलेला संपर्क तुटला होता...

ब्रिटनमध्ये मतदानाला सुरुवात

पुढे पहा

नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण देशामध्ये ४० हजार मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. देशातील शाळा, सरकारी कार्यालये तसेच देशातील सभागृहांमध्ये मतदानकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. ..

तुर्की करणार कतारमध्ये सैन्य तैनात

पुढे पहा

सौदी अरेबिया, यूएई, इजिप्त, येमेन आणि बहरीन या देशांनी कतार बरोबर असलेले आपले राजकीय संबंध तोडल्यानंतर आखाती प्रदेशात दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे...

इसीसने घेतली इराणमधील हल्ल्याची जबाबदारी

पुढे पहा

इराणची राजधानी तेहरान येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनी घेतली आहे. इसीसने नुकताच या संबंधी एक व्हिडीओ जरी केला असून हा हल्ला इसीस द्वारे केला गेला असल्याची कबुली इसीसने दिली आहे...

इराणच्या संसदेत गोळीबार ; आठ ठार, दहा जखमी

पुढे पहा

आज सकाळी संसद सुरु होण्याच्या वेळी काही अज्ञात हल्लेखोर आता बंदुका घेऊन संसदेच्या परिसरात घुसले. तसेच संसदे परिसरात गोळीबार करत संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला...

'पाकिस्तानला दोष देण्याऐवजी, देशांतर्गत मुद्द्यांचा आढावा घ्या'- पाकिस्तान लष्कर

पुढे पहा

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी पाकिस्तानवर केलेल्या आरोपावर पाकिस्तान सेनेकडून अफगाण राष्ट्रपतींना प्रतिउत्तर देण्यात आले आहे...

'कतारशी संबंध तोडणे, हा व्हाईट हाउसचा विजय'- डोनाल्ड ट्रम्प

पुढे पहा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकताच या विषयी खुलासा केला आहे. आपल्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान या विषयावर अन्य देशांच्या प्रमुखांची चर्चा केली होती. परंतु ही गोष्ट मुद्दाम माध्यमांपासून लपवून ठेवण्यात आली होती, असेही ट्रम्प म्हणले आहे. माध्यमांवर थेट टीका करत, ही बातमी माध्यमांना समजली असती तर त्यांच्या खोट्या बातम्यामुळे व्हाईट हाउसची ही नीती कधीच यशस्वी होऊ शकली नसती, असे देखील ट्रम्प म्हणाले आहेत...

‘शेर बहादूर देऊदा’ नेपाळचे नवे पंतप्रधान

पुढे पहा

नेपाळमधील काँग्रेस अध्यक्ष ‘शेर बहादूर देऊबा’ यांची पुन्हा एकदा नेपाळच्या पंतप्रधान पदी नेमणूक करण्यात आली आहे. ‘शेर बहादूर देऊबा’ हे चौथ्यांदा नेपाळच्या पंतप्रधान पदी निवडून आले आहेत...

लंडन हल्ल्यातील तीन आरोपींची माहितीत पोलिसांकडून जाहीर

पुढे पहा

खुरम शहजाद भट (वय-२७, मूळजन्म पाकिस्तान सध्या ब्रिटनमध्ये रहिवास), रचीद इल्कादर (वय-३०, मूळदेश लिबिया), युसुफ झग्बा (वय-२२,मूळदेश इटली) अ..

काबूलमध्ये भारतीय राजदूताच्या घरावर कोसळले रॉकेट

पुढे पहा

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे असलेल्या भारतीय राजदूताच्या घराला आज दहशतवाद्यांकडून लक्ष करण्यात आले. काबूल शहरातील ग्रीन झोन येथे असलेल्या भारतीय गेस्ट हाऊसमधील टेनिस कोर्टवर रॉकेट कोसळले आहे. आज सकाळी ११ वाजून १५ मिनीटांनी ही घटना घडली...

सौदी अरेबियासह पाच देशांचा 'कतार'वर बहिष्कार

पुढे पहा

कतार हा देश दहशतवाद्यांना पाठींबा देत असल्याच्या आरोपावरून सौदी अरेबिया, यूएई, बहरीन, येमेन आणि इजिप्त या पाच देशांनी कतारशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले असल्याची घोषणा केली आहे. ..

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण रक्षणाचा संकल्प

पुढे पहा

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरातून पर्यावरणाच्या रक्षणाचा संकल्प सोडण्यात आला. देशातही यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे...

इनफ इज इनफ - थेरेसा मे यांची लंडन हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया

पुढे पहा

थेरेसा मे यांनी सोशल मिडिया व्यक्त होत म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत झालेले दहशतवादी हल्ले हे सामान्य माणसाशी निगडीत नसून एका विशिष्ट गटाकडून केल्या जाणाऱ्या या हालचाली आहेत. ..

इस्रो करणार सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण

पुढे पहा

जीएसएलव्ही-मार्क III हे आतापर्यंतचे इस्रोचे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र असणार आहे...

काबूलमध्ये साखळी बॉम्बस्फोट, १९ नागरिकांचा मृत्यू

पुढे पहा

अफगानिस्तानची राजधानी काबुल येथे आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. काबुलमध्ये निघालेल्या एका प्रेतयात्रे तीन साखळी बॉम्बस्फोटामध्ये १९ नागरिक ठार झाले आहेत, तर काही सरकारी सुरक्षा अधिकाऱ्यांसह मोठ्याप्रमाणत नागरिक जखमी झाले आहेत...

लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले, ६ नागरिक ठार २० हून अधिक जखमी

पुढे पहा

ब्रिटनच्या वेळेनुसार आज पहाटे ३ वाजता लंडनमधील लंडन ब्रिज, बॉरो मार्केट आणि वॉक्सहॉल या ठिकाणी दहशतवाद्यांनी नागरिकांवर हल्ला चढवला होता..

भारत आणि फ्रान्सचे द्विपक्षीय संबंध मजबूत-नरेंद्र मोदी

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज फ्रान्सच्या दौऱ्यावर असून तेथे त्यांनी फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. या भेटीत नरेंद्र मोदी आणि इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा घडून आली...

पंतप्रधान मोदींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट

पुढे पहा

चार राष्ट्रांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज फ्रान्समध्ये दाखल झाले असून तेथे त्यांनी फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांची भेट घेतली...

अखेर मराठी माणूस बनला पंतप्रधान

पुढे पहा

लिओ यांचे वडील अशोक वराडकर हे मूळचे मालवणजवळील वराड गावचे रहिवाशी आहेत...

परकीय गुंतवणूकीसाठी भारत सुरक्षित राष्ट्र - नरेंद्र मोदी

पुढे पहा

भारत देश परकीय गुंतवणूकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज नरेंद्र मोदी सेंट पीटर्सबर्ग येथील ‘आंतरराष्ट्रीय इकोनॉमिक फोरम २०१७’ ला संबोधित करत होते...

पंतप्रधान यांचे रशियन मुलींकडून हिंदीतून स्वागत

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर 'इतनी शक्ती हमे दे ना दाता' हे गीत गाऊन दाखविले, त्यावेळी खुद्द नरेंद्र मोदी प्रभावित झाले होते. ..

नासा राबवणार जगातील पहिली सौर मोहीम

पुढे पहा

ही मोहीम जगासाठी उत्सुकतेची ठरणार असून, बऱ्याच अंशी यात अनेक बाबतीत अनिश्चितता देखील आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले असून, मानव जातीला यातून खूप काही मिळणार आहे. ..

फिलिपिन्समध्ये दहशतवादी हल्ला, ३० नागरिक ठार

पुढे पहा

काल रात्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेजॉर्ट्स वर्ल्ड मॅनीला कसिनो येथे एका अज्ञात हल्लेखोरांनी ऑटोमॅटीक रायफल सह कसिनोच्या परिसर प्रवेश केला...

पॅरीस करारातून अमेरिका बाहेर

पुढे पहा

दरम्यान ट्रम्प यांचा या निर्णयाचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी विरोध केला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आपल्या भावी पिढीचे मोठे नुकसान होऊ शकते, असे मत ओबामा यांनी व्यक्त केले आहे. त..

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री अखंड : नरेंद्र मोदी

पुढे पहा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर गेले असताना आज नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली...

काबुलमध्ये भारतीय दूतावासाजवळ बॉम्बस्फोट, ८० ठार ३५० नागरिक जखमी

पुढे पहा

अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील भारतीय दूतावासाबाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटामध्ये ६० नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सुदैवाने दूतावासातील सर्व भारतीय अधिकारी सुखरूप असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. ..

जर्मनीनंतर मोदी पोहचले स्पेनच्या दौऱ्यावर

पुढे पहा

स्पेनमधील व्यापारी वर्गाला भारतात मोठ्याप्रमाणत गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे, हा या भेटीमागील सर्वात मोठा उद्देश आहे. स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया-स्पेन सीईओ फोरमच्या बैठकीत देखील मोदी सामील होणार आहेत..

दहशतवाद पुढील पिढीसाठी गंभीर धोका - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढे पहा

मानवतेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे..

इराकमध्ये आत्मघातकी हल्ला, १३ नागरिक ठार २४ जण जखमी

पुढे पहा

काल रात्री साडे दहाच्या सुमारास बगदाद शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका आईसक्रिम पार्लर बाहेर हा स्फोट झाला...

श्रीलंकेतील मृतांची संख्या १८० वर

पुढे पहा

जोरदार वादळी पाऊस आणि जागीजागो झालेल्या भूस्खलनामुळे देशात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे..

ब्रिटेनमधील निवडणुकांसाठी चक्क हिंदीतून प्रचार

पुढे पहा

'टेरेसा के साथ' असे या व्हिडीओतील गाण्याचे शीर्षक आहे. यातील गाणे देखील ब्रिटीश भारतीय नागरिकाने तयार केले आहे. ..

श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतीय नौदल सरसावले

पुढे पहा

पिण्याचे पाणी, अन्न आणि औषधी पाठविण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर डॉक्टरांची तुकडी देखील स्थानिकांच्या सेवेसाठी यात समाविष्ट आहे...

कुलभूषण जाधवला लवकर फाशी द्या, पाकिस्तान न्यायालयात याचिका दाखल

पुढे पहा

पाकिस्तानमधील दोन वकिलांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर नाराजी व्यक्त करत...

श्रीलंकेत पावसाचा कहर , ९१ नागरिकांचा मृत्यू

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला असून श्रीलंकेतील नागरिकांच्या मदतीसाठी भारताकडून जहाजांमार्फत मदत पोहचवली जात आहे...

मँचेस्टर हल्ल्यातील आठ आरोपींना अटक

पुढे पहा

मँचेस्टर पोलिसांची तपास यंत्रणा सुरु झाली, बुधवार संध्याकाळ पर्यंत ७ आरोपींना अटक केली गेली होती, आठवा आरोपी आज सकाळी पोलिसांच्या ताब्यात आला आहे...

ट्रम्प प्रशासनाचा निर्णय पाकिस्तानला देण्यात येणारी मदत होणार कमी

पुढे पहा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने यंदाच्या वर्षीचा अमेरिकेचा अर्थ संकल्प तयार केला आहे. यामध्ये अमेरिकन अर्थ व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासने बाहेर देशांना देण्यात येणाऱ्या एफएमएफ संबंधी नवीन नियम लावण्याचा प्रस्ताव त्यात मांडला आहे. ..

पाक म्हणतोय हल्ला झालाच नाही....

पुढे पहा

यावर पाकिस्तानी मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, पाकिस्तानी चौक्या उध्वस्त करण्याचा भारतीय लष्कराचा दावा खोटा आहे...

जेम्स बाँडची भूमिका साकारणारे सर रॉजर मूर काळाच्या पडद्याआड

पुढे पहा

हॉलीवूड चित्रपटात जेम्स बाँडची प्रमुख भमिका साकारणारे सर रॉजर मूर यांचे आज निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. हॉलीवूड चित्रपटात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये हेरगिरीची भूमिका साकारणारे सर रॉजर मूर यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी आज त्यांच्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे...

मँचेस्टर हल्ल्याचा सूत्रधार इसिस

पुढे पहा

इसिसने याचा खुलासा केला असून, आम्हीच हल्ला घडवला आहे, अशी कबुली देखील इसिसने दिली..

नासा आणि इस्रो बनवणार जगातील सर्वात मोठा उपग्रह

पुढे पहा

या प्रकल्पाचे पूर्ण नाव नासा-इस्रो सिंथेटिक अपरचर रडार सॅटेलाइट असे असून याच्या निर्मितीसाठी १ खर्व रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ..

इंग्लंडमधील बॉम्बस्फोटात २२ नागरिक ठार, ५० जण जखमी

पुढे पहा

हा हल्ला ब्रिटनच्या स्थानिक वेळेनुसार काल रात्री १०. ३३ मि. झाला..

भारत दहशतवादाचा बळी - डोनाल्ड ट्रम्प

पुढे पहा

मध्य आशियात असलेले विविधतेने नटलेली संस्कृती यामुळे संपुष्टात आली आहे. या दहशतवादात सर्वाधिक नुकसान मुस्लीमांचेच झाले आहे. हे सांगायला देखील ते विसरले नाहीत...

हसन रुहानी दुसऱ्यांदा बनले इराणचे राष्ट्राध्यक्ष

पुढे पहा

हानी २ कोटी पेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. इराणचे सुधारक अशी त्यांची जनतेत आणि जगात ख्याती आहे. त्यामुळेच दुसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यात त्यांना यश मिळाले आहे...

पाकिस्तानकडून जाधव प्रकरणी ICJ मध्ये फेरविचार याचिका दाखल'

पुढे पहा

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरण पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी आज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ..

अमेरिकेची आणखी एक युद्धनौका कोरियन सागरात तैनात

पुढे पहा

उ.कोरियावर दबाब टाकण्यासाठी अमेरिकेने या अगोदरच आपली एक युद्ध नौका आणि काही क्षेपणास्त्र उ.कोरियाच्या सीमेवर तैनात केली आहेत. असे असताना देखील उ.कोरियाने आपला आडमुठेपणा न सोडता पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी केली. यानंतर अमेरिकेने आपली यूएसएस रोनाल्ड रेगन ही युद्धनौका बुधवारी उ.कोरियाच्या दिशेने रवाना केली...

प्रसिद्ध वेबसाईट 'झोमॅटो'मधील १७ दशलक्ष युझर्सची माहिती हॅक

पुढे पहा

झोमॅटो वेबसाईटची १७ दशलक्ष युझर्सची माहिती हॅक करण्यात आली आहे. याबद्दल स्वत: झोमॅटोने ब्लॉग लिहून ग्राहकांना कळविले आहे...

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; पाकचा खोटारडेपणा उघड

पुढे पहा

अंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती देत पाकिस्तानला दणका दिला आहे. खटला पूर्ण होई पर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही...

कुलभूषण जाधव प्रकरणी निकालाची सुनावणी Live

पुढे पहा

कुलभूषण जाधव प्रकरणी अंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निकाल सुनावत आहे. ..

कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या निकाल

पुढे पहा

पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना दिलेली फाशीची शिक्षा रद्द होईल का? याकडे भारत पाकिस्तानासहित संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे...

फोर्ब्सच्या 'वर्ल्ड गेम चेंजर' यादीत मुकेश अंबानी अव्वल

पुढे पहा

गेल्या वर्षभरात उद्योजकांच्या कल्पनेमुळे विविध क्षेत्रात घडून आलेल्या बदलांमुळे एका प्रकारची क्रांतीच घडून आली आहे...

पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहिणीचा कॉर्नेल विद्यापीठातर्फे गौरव

पुढे पहा

पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहिणीचा कॉर्नेल विद्यापीठातर्फे गौरव ..

कुलभूषण जाधव प्रकरण - आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी LIVE

पुढे पहा

ही सुनावणी Live बघू शकता...

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती चार दिवसीय भारत दौऱ्यावर

पुढे पहा

काल रात्री उशिरा अब्बास हे आपल्या विमानाने दिल्ली विमानतळावर दाखल झाले. ..

हाफिज सईद जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवत आहे - पाक गृह मंत्रालय

पुढे पहा

मुंबई हल्ल्याच्या सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद हा जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवत असल्याच्याची कबुली पाकिस्तान गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने दिली आहे. ..

चीनच्या 'ओबीओआर' बैठकीवर भारताचा बहिष्कार

पुढे पहा

जगातील ६५ देश आणि आशिया, युरोप आणि आफ्रिका या तीन खंडांना एकत्र जोडण्यासाठी चीन 'वन बेल्ट, वन रोड' ही योजना राबवत आहे. या योजनेमार्फत चीन इतर देशांमध्ये पायाभूत सुविधा, वाहतूक, रस्ते आणि बंदरे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ..

'ओबीओआर'च्या माध्यमातून चीन-नेपाळ यांच्यात करार

पुढे पहा

'वन बेल्ट वन रोड' या प्रकल्पाअंतर्गत आज चीन आणि नेपाळ यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारानुसार नेपाळने आपल्या हद्दीमध्ये चीनला सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीला परवानगी दिली आहे. चीन आणि नेपाळ यांच्यातील ही वाढती जवळीक आगामी काळात भारताला डोकेदुखी ठरू शकते. ..

हाफिज सईदसह पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर अमेरिकेची बंदी

पुढे पहा

मिडिल इस्टमध्ये असलेल्या लष्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा, तालिबान, जमात-उल-दावा अल कुरान जेडीक्यू ,इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सीरिया, आईएसआईएस खोरासन या संघटनांच्या वाढत असलेल्या आक्रमकतेला पाकिस्तानमधून अर्थपुरवठा होता आहे...

बलुचिस्तान येथे आत्मघातकी हल्ल्यात १७ जण ठार, ३० जण जखमी

पुढे पहा

बलुचिस्तानमधील क्वेटापासून ९० किमी दूरवर असलेल्या मस्तंग येथे आज दुपारी एका मशिदी बाहेर हा स्फोट झाला. दुपारी शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येथे जमले होते. ..

एकतेच्या धाग्याला मजबूत करण्याची आवश्यकता आहे - पंतप्रधान मोदी

पुढे पहा

आपल्याला एकात्मकता आणि सुसंवादाच्या धाग्याला एकत्र जोडून ठेवण्याची गरज आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीच्या श्रीलंका दौऱ्यात मोदी डिकोया येथील भारतीय तमिळ समुदायाला ते संबोधित करत होते...

आपल्याला डिजिटल इंडियाबद्दल हे माहित आहे काय?

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली...

पाकिस्तानच्या संरक्षण खात्याकडून #HangKulbhushan ट्रेंड व्हायरल

पुढे पहा

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने १० एप्रिल रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती...

कुलभुषण जाधव प्रकरणी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

पुढे पहा

कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान विरोधात १५ तारखेला सुनावणी करण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वतीने देण्यात आली आहे...

पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसीय श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना

पुढे पहा

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक दिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ..

दक्षिण कोरियामध्ये राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु

पुढे पहा

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती पार्क गेन-हुई यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदावरुन काढून टाकण्यात आले असल्याने दक्षिण कोरियाचे राष्ट्रपतीपद रिक्त झाले होते त्यामुळे हे पद लवकरात लवकर भरण्यासाठी आज दक्षिण कोरियामध्ये राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक घेण्यात येत आहे...

आज मुंबईत दाखल होणार जस्टिन बीबर

पुढे पहा

युवा पीढीचा आवडता आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबर आज मुंबईत दाखल होणार आहे. १० मे रोजी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानात त्याचा भव्य कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टसाठी असलेल्या उच्च कींमतींच्या तिकिटांमुळे जस्टिन बीबरचा हा कॉन्सर्ट खूप चर्चेत होता...

'एनसीजी गटातील प्रवेशासाठी आमचा कोणालाही विरोध नाही'- चीन

पुढे पहा

एनसीजी (अणु पुरवठादार गट) गटामध्ये प्रवेशासाठी चीनचा कोणत्याही देशाला विरोध नाही. ..

इमॅन्युअल मॅक्रोन यांची फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी निवड

पुढे पहा

मॅक्रोन हे अगोदर बँक अधिकारी कार्य करत होते. या बरोबरच त्यांनी पहिल्यांदाज राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली आहे. ..

फ्रान्समध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

पुढे पहा

फ्रान्सच्या नव्या राष्ट्रपतीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येणार आहे...

व्हेनेझुएलातील संविधान बदलविरोधी आंदोलनात ३८ नागरिकांचा मृत्यू

पुढे पहा

गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला होता. मोदींच्या या पावलावर पाउल टाकत मादुरो यांनी देखील व्हेनेझुएलामध्ये नोटाबंदीचा आदेश दिला होता...

अफगाणिस्तान येथे आत्मघातकी हल्ल्यात ८ नागरिक ठार

पुढे पहा

अफगाणिस्तान येथील काबुल येथे अमेरिकी दूतावास जवळीत नाटोच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. ..

सातासमुद्रापार महाराष्ट्र दिन साजरा

पुढे पहा

महाराष्ट्र दिन हा केवळ महाराष्ट्रातील लोकांसाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी लोकांसाठीही तितकाच महत्वाचा आहे. ..

हाफिज सईदच्या नजरकैदेत वाढ

पुढे पहा

हाफिज आणि त्याच्यासह प्रोफेसर मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद, काझी काशफ हुसेन आणि अब्दुल्ला उबेद या त्याच्या साथीदारांना तीन महिन्यांसाठी नजरकैदेत ठेवले होते...

आयआयटीतील ब्रेनड्रेन कमी करण्याच्या प्रयत्नात सरकार

पुढे पहा

विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यासाठी प्रतिमाह ७५ हजार रुपयांची तरतूद व्हावी यासाठी शिफारस करण्यात आली आहे...

ट्रम्प सरकारचे पहिले १०० दिवस सर्वधिक यशस्वी

पुढे पहा

डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केली होती. आज त्यांच्या कार्यकाळाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत...

उत्तर कोरियाकडून पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी

पुढे पहा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील उ.कोरियाच्या या कृतीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ..

अण्णा हजारेंनी सांगितले 'आप'च्या परायजाचे कारण

पुढे पहा

दिल्ली येथे आपच्या झालेल्या दारुण पराभवाचे कारण सांगत आहे अण्णा हजारे.. ..

नासाचे 'कसिनी' उपग्रह शनीच्या कड्यांमधून पार

पुढे पहा

कसिनीने गेल्या २४ तारखेला शनीच्या कड्यांमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान कसिनीचा पृथ्वीबरोबर असलेला संबंध तुटला होता. ..

उ.कोरियाच्या सीमेवर अमेरिकेची क्षेपणास्त्र तैनात

पुढे पहा

  उत्तर कोरिया आणि अमेरिका या दोन देशांमधील वातावरण आता आणखीनच चिघळत चालले आहे. उत्तर कोरियाच्या वाढत्या आक्रमक धोरणामुळे अमेरिकेने देखील आता आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. उत्तर कोरियावर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकेने आपली क्षेपणास्त्रे उत..

भारतात पहिल्यांदाच रेल्वेत पाणी रहित शौचालयांची सुरुवात होणार

पुढे पहा

भारतातील पाण्याच्या मोठ्या प्रश्नाला पाहता रेल्वे मंत्रालयातर्फे भारतातील रेल्वे गाड्यांमध्ये पाणी रहित शैचालय सुरु करण्याचा निर्धार केला आहे. भारताबाहेर अनेक दशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी अशा शौचालयांचा वापर करण्यात येतो, मात्र भारतात हे पहिल्यांदाच होणार आहे...

जगातील सगळ्यात वजनदार महिलेच्या उपचारास डॉक्टरांचा नकार

पुढे पहा

जगातील सगळ्यात वजनदार महिला इमान अहमदच्या बहिणीने डॉक्टरांवर केलेल्या आरोपांनंतर डॉ. लकडावाला आणि इतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इमानला पुन्हा तिच्या घरी म्हणजेच अबूधाबीला परत घेवून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इमानचे वजन ५०० किलो होते, जे शस्त्रक्रियेनंतर ११७ किलोंवर आले होते. मात्र इमानच्या प्रकृतीत सुधार होत नसल्याचा व डॉक्टर खोटे बोलत आहेत असा आरोप इमानच्या बहिणीने केला होता, ज्यानंतर इमानवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे. ..

सीरियाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोट

पुढे पहा

सीरिया येथील दमिश्क आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आज मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हा विस्फोट इतका भीषण होता की याचा आवाज संपूर्ण दमिश्क शहराने ऐकला असल्याची माहिती समोर आली आहे. ..

भारत आणि पोलंड यांच्यात कृषी विषयक करार

पुढे पहा

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे पोलंड दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात भारत आणि पोलंड या दोन्ही राष्ट्रांमध्ये कृषी विषयक एका करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली. हमीद अन्सारी आणि पोलंडच्या पंतप्रधान बीटा सजील्डो यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली या चर्चेदरम्यान भारत आणि पोलंड यांच्यात एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली...

गुन्हेगारांना शिक्षेसाठी पोलीस दल वापरणार ‘ॲम्बिस’ प्रणाली

पुढे पहा

गुन्ह्यांची उकल करुन गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी न्यायालयात ठोस पुरावे सादर करता यावेत. यासाठी पोलीस आधुनिकीकरणातून राज्य पोलीस दलात आता नव्याने ‘ॲम्बिस’ (Automated Multimodel Biometric Identification System) प्रणाली वापरण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नवीन प्रणालीमुळे आरोपीच्या बोटांचे ठशे व छायाचित्रांची डिजीटल पध्दतीने साठवणूक करुन त्याचा वापर गुन्ह्यांचा शोध लावण्याबरोबरच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी निश्चितच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ..