मनोरंजन

तर पुढच्या मे मध्ये येणार "स्टूडंट ऑफ द इयर - २"

करण जौहर नेहमीच त्याच्या चित्रपटांसाठी चर्चेत राहिला आहे. त्याने प्रदर्शित केलेल्या स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटातून चित्रपटसृष्टीला आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन सारखे कलाकार मिळाले आणि आता तो घेऊन येत आहे स्टूडंट ऑफ द इयर -२. १० मे २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला हजर राहणार आहे, अशी माहिती करणने आज इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया असणार आहेत. टायगर श्रॉफ जरी प्रेक्षकांच्या ओळखीचा असला तरी इतर दोघींना भेटण्यासाठी

पुढे वाचा

सलमान आणि शाहरुखला भासतेय एकमेकांची गरज ?

सिनेसृष्टीतील दोन दिग्गज नावे म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान. नेहमीच ही दोन नावे चर्चेत राहिली आहेत. करन-अर्जुन सारख्या चित्रपटानंतर एकत्र एखादा चित्रपट जरी केला नसला तरी त्यांच्या मधील भांडण मात्र संपूर्ण देशात गाजलं, त्यामुळे आता या भांडणाच्या काही वर्षांनंतर एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करताना ते दिसतायेत, त्यावेळी प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज शाहरुख खानच्या 'झीरो' या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये सलमान खान सर्वांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहे, त्या

पुढे वाचा