म्हणून नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी कडक नियम

    04-May-2024
Total Views |

trambakeshvar 
 
नाशिकचे त्रंबकेश्वर मंदिर अनेक कारणांनी आपल्याला परिचित आहे. अनेक धार्मिक कारणांसोबतच हे मंदिर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कधी परकीय आक्रमकांच्या चढाईने मानीत पाडले तर कधी सर्व भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. आजही स्त्रियांना गर्भगृहात जाण्याची परवानगी नाही. आज हा विषय उकरूनकाढण्याचे कारणच मुळात १९६७ साली श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय झाला. हा निर्णय आजच्या दिवशी घेण्यात आला आणि म्हणून या मंदिराचा थोडक्यात इतिहास या निमित्ताने सांगतेय.
 
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. यातला हिंदू हा शब्द महत्वाचा आहे. आपण म्हणतो, हिंदू हि संस्कृती आणि आणि तीचे पालन करण्यासाठी कुणावर काही बंधने नाहीत. हिंदू देव देवतांची पूजा अर्चना कुणीही करू शकतो. मात्र या मंदिरात मुस्लिम भक्तांना जाण्यास मनाई आहे. याबद्दलचा वाद गेल्या वर्षीच उफाळून आला होता हे आपण सर्वांना आठवत असेल. आता खरी मेख अशी, की, इतक्या सहिष्णू हिंदूंना त्यांच्या शिवाची पूजा करणारा मुसलमान बांधव का नको व्हावा? त्याचे कारण या मंदिराच्या इतिहासात आहे.
 
दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय. ज्यांना आपण बारा जोतिर्लिंगे म्हणतो? ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे - बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे - टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी - रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या - हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ - खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या - पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या - पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी - वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.
 
या मंदिराचे महत्व इतके आहे की, येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर सुद्धा आहे. एवढेच काय, दक्षिण काशी मानले जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम येथेच झाला.
 
त्यानंतर भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. आज मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केलीय. त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथे च केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्प पुजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थ विधी हे व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात.
पण तरीही अजूनही महिलांना मात्र मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. अभिषेकादि विधी करावयाचे असल्यास पुरुषांनाच पुजार्यांसमवेत गर्भगृहात जाता येते.