रोहित वेमुलाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी होणार! 'हे' आहे कारण

    04-May-2024
Total Views |

Rohit Vemula  

(रोहित वेमुलासाठी आंदोलन करणारे विद्यार्थी - File Photo)
 
 
नवी दिल्ली : तेलंगणाच्या हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पुन्हा होणार आहे. तेलंगणा पोलीसांनी याबद्दलची माहिती दिली आहे. वेमुलाची आई आणि अन्य काही जणांच्या मागणीवरुन ही चौकशी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तेलंगणा पोलीसांनी जारी केलल्या एका वक्तव्यात डीजीपी म्हणाले की, "मृतक रोहित वेमुलाच्या आईसह अन्य काही जणांनी या प्रकरणात संशय असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आम्ही अतिरिक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील एक याचिका कोर्टात दाखल केली जाणार आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांतर्फे परवानगी मिळाल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे."
 
ते म्हणाले की, "या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, माधापूर यांच्याकडे होता. त्यांनी अंतिम क्लोजर रिपोर्ट नोव्हेंबर २०२३ च्या पूर्वी केलेल्या तपासावर तयार केला होता. हा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी २१ मार्च २०२४ रोजी कोर्टात दाखल केला. तेलंगणा पोलीसांनी न्यायालयात हा अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये वेमुलाच्या आत्महत्येचा खुलासा करण्यात आला आहे. जात प्रमाणपत्र बनावट असल्याची भिती सतावत असल्याने त्याने ही आत्महत्या केली. तो अनुसूचित नसल्याची माहिती जर कळली तर पदव्या रद्द होतील या भितीने रोहितने आत्महत्या केली, असा अहवाल सादर करण्यात आला आहे.
 
 
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या आईने त्याला हे बनावट प्रमाणपत्र बनवून दिले होते. त्याला ही चिंता सतावत होती की जर का हे बाहेर कळाले तर त्याच्या सर्वच पदव्या रद्दबातल होतील. पोलीसांनी दिलेल्या कोल्जर रिपोर्टनुसार, रोहित वेमुलाची मूळ जात वड्डेरा होती. ही जात मागासवर्गीय आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीत त्याच्या मृत्यूला अन्य कुणीही जबाबदार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासह हे देखील सांगण्यात आले की, रोहित वेमुलाच्या जातीची ओळख पटवण्यासाठी जेव्हा त्याची आई राधिका यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी कुठलेही उत्तर दिलेले नाही.
 
 
पोलीसांना रोहितच्या आईचे DNA नमुने अन्य परिवाराचे डीएनए चाचणी करुन तपासात महत्त्वाची माहिती मिळवू पाहत होते. रोहितचा कल अभ्यासापेक्षा राजकारणाकडे झुकणारा होता, असेही या अहवालात म्हटले आहे. रोहित वेमुलाचे मृत्यू प्रकरण राजकीय वळण घेत होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षांवर टीका केली जाऊ लागली होती. काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारसह केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना लक्ष्य करण्यासाठी या घटनेचा वापर केला. याला जातीय रंग देण्याचा प्रयत्नही काँग्रेसकडून देण्यात आला. त्यांनी केंद्र सरकारवर या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला होता.
 
 
हिंदूविरोधासाठीही केला वापर
 
 
रोहित वेमुला याच्या आत्महत्येचा वापर एएसए, एसएफआय या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना, डावे पक्ष, डावे कथित विचारवंत, काँग्रेस नेते राहुल गांधी आदींना आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठी केला. वेमुला याच्या आत्महत्येला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार त्याचप्रमाणे रा. स्व. संघ आणि हिंदुत्ववादी जबाबदार असल्याचाही दावा या इकोसिस्टीमकडून अजूनही करण्यात येतो. अहवालात मात्र वेमुला हा आपल्यास संघटनेवर नाराज होता, नमूद केले आहे. त्यामुळे या इकोसिस्टीमला तडाखा बसला आहे.