इसरोची विस्मयजनक अवकाशयात्रा शब्दांच्या जादुई माध्यमातून मुलांच्या भेटीला

    04-May-2024
Total Views |

isro 
 
मुंबई : चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर अवकाशाकडे पाहण्याची भारतीयांची दृष्टी बदलली. या मोहिमेनंतर संपूर्ण भारतवासीयांमध्ये आनंदाची, अभिमानाची भावना निर्माण झाली आणि अवकाश क्षेत्राविषयी जाणून घेण्याविषयीची उत्सुकताही वाढली. अनेकांनी या क्षेत्राकडे करियरसाठी सकारात्मकतेने पाहायला सुरुवात केली आहे. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या क्षेत्राची माहिती हवी आहे. तरुणपिढी सुद्धा उत्सुकता दाखवू लागली आहे.
 
या क्षेत्राविषयीची सविस्तर माहिती मिळण्यासाठी विवेक प्रकाशन 'इसरोची विस्मयजनक अवकाशयात्रा' हे पुस्तक लवकरच प्रकाशित करीत आहे. लेखक 'सुरेश नाईक' स्वतः इसरोचे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आहेत. तसेच पुस्तकाचे शब्दांकन पुण्याच्या ऋता बावडेकर यांनी केले आहे. अवकाश तंत्रज्ञान, चांद्र मोहीम, आतापर्यंत झालेले अध्यक्ष, आकाश आणि अवकाश या मधील फरक, अवकाशातील कचऱ्याची समस्या, अवकाशातील अंतराळवीराचे दैनंदिन जीवन, अंतराळ पर्यटन वास्तवात येणार का? अशा अनेक गोष्टींची विस्मयजनक माहिती जाणून घेण्यासाठी पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी करण्याचे आवाहन प्रकाशकांनी केले आहे.
 
रंगीत, आकर्षक छायाचित्रे आणि अवकाश क्षेत्राविषयी आपली उत्सुकता क्षमविणारी माहिती.
मूल्य : 160/- रु.
सुट्टीत मुलांना भेट देण्यासाठी उपयुक्त पुस्तक.
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858