‘नाच गं घुमा’ने पहिल्याच दिवशी जमवला कोटींचा गल्ला

    02-May-2024
Total Views |
परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा’ चित्रपटाला महिलांचा विशेष प्रतिसाद
 

nach ga ghuma  
 
मुंबई : वर्किंग स्त्रीच्या जीवनात मोलकरणीचे किती महत्व आहे हे पटवून आणि त्याची जाणीव करुन देणारा ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच तिकीट बुकिंगचा एक विक्रम आपल्या नावे केला होताच. पण (Nach Ga Ghuma) आता बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने यशस्वी खाते उघडले आहे.
 
‘नाच गं घुमा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.१३ कोटी कमावले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिल्या दिवसाच्या व्यवसायाच्या बाबतीत या चित्रपटाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटींचा गल्ला जमवला होता. परंतु, आत्तापर्यंत सैराट चित्रपटाचा कोणी रेकॉर्ड मोडू शकला नाही आहे. या चित्रपटाने २०१६ साली पहिल्याच दिवशी ३.६ कोटींची कमाई केली होती.
 
परेश मोकाशी दिग्दर्शित ' नाच गं घुमा ' मध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्या मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे लेखन केले असून त्यांच्यासह शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.