एकत्रित गोदरेज समुहाचा 'अस्त ' कंपनीची कुटुंबात विभागणी झाली

समंजसपणा दाखवत कंपनीच्या विभागण्या

    01-May-2024
Total Views |

Godrej
 
 
मुंबई: अखेर एकत्रित गोदरेज समुहाच्या एकीचा आज अंत झाला आहे. १२७ वर्ष जुना उद्योग समुह गोदरेज यांनी व्यवसायाची विभागणी केली आहे. त्यामुळे दोन समुहात या चार ते पाच नोंदणीकृत कंपन्यांची विभागणी होणार आहे. साबणापासून, कुलूप, रियल इस्टेट, तंत्रज्ञान, घरगुती उपकरणे अशा विविध व्यवसायाची विभागणी केली जाणार आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कंपनीची दोन विभागात वाटणी होणार आहे. ज्यामध्ये आदि गोदरेज व त्यांचे बंधू एका ठिकाणी व दुसऱ्या बाजूला चुलत भाऊ जमशेद गोदरेज व स्मिता गोदरेज असणार आहेत. आदि गोदरेज व नादिर यांना पाच नोंदणीकृत कंपन्या ताब्यात मिळणार असून नोंदणीकृत नसलेली गोदरेज व बोयसी व त्यासंबंधी असलेल्या कंपनीचा हिस्सा जमशेद व स्मिता गोदरेज यांना मिळणार आहेत. नोंदणीकृत कंपन्यांमध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कनज्यूमर प्रोडक्ट, गोदरेज प्रोपर्टी, गोदरेज एग्रोवेट, एसटेक लाईफसायन्सेस,इनोव्हिया मल्टीवेंचर प्रायव्हेट लिमिटेड,गोदरेज सिडस व जेनेटिक,अनामूडी रियल इस्टेट आणि संबंधित उद्योगांचे नियंत्रण आदि गोदरेज, नादिर गोदरेज यांच्याकडे असणार आहे.
 
दुसरीकडे गोदरेज एंटरप्राईज ग्रुप या विना नोंदणीकृत कंपन्या जसे की गोदरेज व बोयसी मॅनुफॅक्चरिंग कंपनी, गोदरेज होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड , गोदरेज इन्फोटेक लिमिटेड व संबंधित कंपन्याचे नेतृत्व जमशेद गोदरेज व कुटुंबाकडे असणार आहेत.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात कुठलेही दावे प्रतिदावे नसून अतिशय शांत व समंजसपणा दाखवत कंपनीचे विभाजन करण्यात आले आहे.यासंबंधी अधिक माहिती देताना, ' गोदरेज कुटुंबातील सदस्यांच्या भिन्न दृष्टीकोनाची पोचपावती म्हणून सुसंवाद राखण्यासाठी आणि मालकी अधिक चांगल्या प्रकारे संरेखित करण्यासाठी आदरपूर्वक आणि सजग मार्गाने पुनर्संरचना करण्यात आल्याचे कुटुंबाने सांगितले. "हे धोरणात्मक दिशा, फोकस, चपळता वाढविण्यात मदत करेल आणि भागधारक आणि इतर सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती देईल,' असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.