लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा ‘छावा’ (Vicky Kaushal) हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु असून आता 'छावा' तील विकीचा छत्रपती संभाजी महाराजांचा लूक समोर आला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसणाऱ्या विकीच्या गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर शिवगंध, केस बांधलेले दिसत आहेत. या भूमिकेसाठी योग्य शरीरयष्ठी देखील विकीने तयार केलेली दिसून येते.
'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत. तसेच, या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर देखील झळकणार असून नुकतीच त्याने विकी कौशल सोबत धम्माल मस्ती करणारी एक पोस्ट शेअर केली होती. मुळात मिमी सारखा चित्रपट घेऊन येणारे लक्ष्मण पहिल्यांदाच ऐतिहासिक कलाकृती भेटीला घेऊव येत आहेत. या चित्रपटात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असून रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.