२० वर्षांनी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झालेल्या विजयच्या ‘घिल्ली’ने केली दमदार कमाई

    23-Apr-2024
Total Views |

ghilli  
 
 
मुंबई : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘घिल्ली’ (Ghilli) चित्रपट चक्क २० वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा कोटींच्या घरात अवघ्या दोन दिवसांत कमाई केली आहे.
 
१७ एप्रिल २००४ रोजी घिल्ली हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. आणि आता २० वर्षांनीही चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. २० एप्रिल २०२४ रोजी पुन्हा पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ दोन दिवसांत १२ कोटी कमावले आहेत.
‘सॅकनिल्क’ च्या माहितीनुसार, २००४ साली हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता, त्यावेळी बजेट ८ कोटी होते पण या चित्रपटाने ४० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. घिल्ली हा चित्रपट २००३ साली आलेल्या तेलुगू ब्लॉकबस्टर ‘ओक्कडू’चा रिमेक असून त्यात महेश बाबू आणि भूमिका मुख्य भूमिकेत होते.
 
तर ‘घिल्ली’ या चित्रपटात थलपती विजयसह त्रिशा कृष्णन, प्रकाश राज आणि आशिष विद्यार्थी अशी मोठी कलाकारांची फौज आहे. पुन्हा एकदा २० वर्षानी विजयचे चाहते त्यांना तारुण्यात पाहून अधिक आनंदी होताना दिसत आहेत.