तिवरे धरणप्रकरणी मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
महा एमटीबी   03-Jul-2019


 

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतीलजीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. यासंदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेसजबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातीलतिवरे येथील धरण फुटल्याची घटना काल रात्री घडली. त्यात एक वाडी वाहूनजाऊन काही लोक बेपत्ता झाले आहेत, तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत.या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधूनमदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्तीनिवारण दलाकडून सुरु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. यादुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनीस्पष्ट केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat