मुंबईकर बेहाल : मालाडमध्ये कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू
महा एमटीबी   02-Jul-2019


 

मुंबई : गेल्या आठवड्यापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहेत. दरम्यान, दुसऱ्या दुर्घटनेत दोन जणांच मृत्यू झाला आहे. त्यासोबतच कल्याणमध्येही शाळेची भिंत घरावर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला.

 

मुंबईकर अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत, मालाडमध्ये सर्वाधिक पावसाच्या दुर्घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. मालाडच्या सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे गाडी अडकली. यावेळी गाडीत गुदमरुन दोघांचा दुदैर्वी मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह सहा तासांनी गाडीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. इरफान खान (३८) आणि गुलशाद शेख (३५), अशी या मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने पहाटे चारच्या सुमारास कार बाहेर काढली. यानंतर या दोघांचे मृतदेह यामधून काढण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat