सोनभद्र हत्याकांड : जमावबंदी नाकारून प्रियांका गांधी घटनास्थळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019
Total Views |


 

 
उत्तरप्रदेश : सोनभद्र येथे जमीन वादातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या उत्तर प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांना रोखण्यात आले आहे. घटनेचा निषेध म्‍हणून प्रियांका गांधी व काँग्रेस नेते मिर्जापूर येथे आंदोलनास बसल्या होत्या. यावेळी आंदोलनास बसलेल्‍या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्‍यात घेतले. मात्र,  प्रियांका यांना अटक  झालेली नाही. सोनभद्रा या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.  प्रियांका या कोणत्याही परवानगीशिवाय याठिकाणी आल्याने त्यांना रोखण्यात आल्याचे उत्तरप्रदेश पोलीस महासंचालकांनी सांगितले.

 
 
 

आंदोलनापूर्वी प्रियांका गांधी-वढेरानी वाराणसीतील ट्रॉमा सेंटरमध्ये जाऊन सोनभद्र घटनेत जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली. सोनभद्र याठिकाणी कलम १४४ म्हणजे अर्थातच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चुनार येथील गेस्ट हाऊस मध्ये ठेवण्यात आला. प्रियांका म्‍हणाल्‍या की, 'माझ्या इथे येण्याने प्रशाकीय यंत्रणेवर कोणताही ताण येणार नसून, सोनभद्रमध्ये जे लोक मृत झाले. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी आले आहे. 

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@