देवव्रत गुजरात व मिश्रा हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2019
Total Views |




नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची गुजरातच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी कलराज मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्त्या केल्या. गुजराचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांचा कार्यकाळ संपत आल्याने देवव्रत यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.


हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी निवड झालेले कलराज मिश्रा यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिपदाची जबादारी पार पाडली होती. मोदी सरकारच्या काळात त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार होता. मात्र वाढत्या वयामुळे त्यांनी २०१९ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. याचमुळे त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, लवकरच दोघे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@