"सोशल मीडिया पोस्टची हेरगिरी आयकर विभाग करत नाही"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : देशविदेशातील सहली, महागड्या गाड्या, उच्च राहणीमान या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करणे महागात पडू शकते, असा व्हायरल मेसेज काही काळापासून व्हॉट्सअप, फेसबूकवर व्हायरल होत आहे. यात तुम्ही अलिशान जीवन जगत असल्याचा सोशल मीडियावरील फोटो तुम्हाला आयकर विभागाच्या चौकशीसाठी पाठवू शकतो, असा दावा त्यात करण्यात आला होता. मात्र, असा कोणताही पाठपुरावा आयकर विभाग करत नसल्याचा दावा केंद्रीय आयकर विभागाने केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष पी.सी. मोदी यांनी ही माहिती दिली.

 

एका वृत्तपत्राला दिलेल्या सविस्तर माहीतीत त्यांनी हा उल्लेख केला. 'आयकर विभागाला अशी हेरगिरी करण्याची गरज नाही. आमच्याकडे बेहीशोबी मालमत्ता असणाऱ्या करचुकवेगीरीची आकडेवारी विविध संस्थांकडून येते. त्याची पडताळणी करण्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र्य व्यवस्था आहे. त्याद्वारे आम्ही कुणाची चौकशी करायची की नाही, याची माहीती देतो.'

 

आयकर विभाग सोशल मीडियावरील लोकांच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर लक्ष ठेवून असतो का या प्रश्नावर मोदी यांनी हे उत्तर दिले. प्रसिद्धी माध्यमांनी केलेल्या या दाव्याला फोल ठरवत अधिकाऱ्यांनी अशी कोणतिही यंत्रणा नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला करचुकवेगिरीला पकडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्याची काही गरज नाही, अशी पडताळणी आम्ही करत नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@