मस्त करा भटकंती, आता वेदनांची नको भीती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2019
Total Views |

पावसाळा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, नवसर्जनाचा काळ. पावसाने जोर धरला की दर शनिवार-रविवार कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत कुठे ना कुठे पिकनिकला जायचे बेत आखले जाऊ लागतात. लहान-मोठे सगळेच पाण्यात मनसोक्त डुंबतात, बेभान होऊन नाचतात. तो सगळा दिवस या नाचण्या-बागडण्यात कसा आनंदात जातो.

 
 

पण दिवस सरला की सगळी मजा, धांगडधिंगा सांध्यासांध्यातून बोलू लागतो. कधी नव्हे इतके श्रम सगळ्या शरीराला झालेले असतात. त्यात भिजल्यामुळे शरीर आखडलेलं असतं. त्यामुळे सांधे आणि स्नायू आखडतात. काही करू नये, नुसतं पडून राहावंसं वाटतं. पण अंगदुखीमुळे ते ही शक्य नसतं आणि दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला जायला तयार व्हावंच लागतं. अशा वेळी नुसत्या मलमांनी आणि वेदनाशामक गोळ्यांनी काम भागत नाही. त्यासाठी आयुर्वेदात औषधी वनस्पतींनी सिद्ध केलेल्या तेलाने मालिश हाच उपाय सांगितला आहे. अशाच प्रभावी वनौषधींच्या उत्तम संयोगातून पितांबरी हेल्थकेअर डिव्हिजनने तयार केलं आहे क्युअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइल. यातला मुख्य घटक म्हणजे तीळ तेल कारण ते त्वचेत सहज आणि चट्कन जिरते. तसेच आपल्याबरोबर इतर वनौषधींनाही वेदनेच्या मुळापर्यंत पोहचवते. शिवाय तीळ तेलामध्ये शरीरासाठी पोषक ' ' व्हिटामिन मुबलक प्रमाणात असते. पावसाळ्यात वातदोष वाढतो. त्यामुळे सांधे व स्नायूदुखीचे विकार उद्भवतात. अश्वगंधा, गंधपुरव, सहचर, सारख्या वनस्पतींचा या तेलात समावेश आहे.

 

दुखऱ्या स्नायूंना पूर्ववत शक्ती देणाऱ्या रुई फूल, शतावरी, निर्गुंडी सारख्या बल्यवर्धक वनस्पतींच्या वापराने स्नायूंची धारणशक्ती वाढते. आखडलेले बोटे, गुडघे आणि विविध सांध्यांची हालचाल सुरळीत व्हावी तसेच सांध्यांतील वंगणाचे प्रमाण योग्य राखण्यासाठी हे तेल अत्यंत उपयुक्त आहेत. याशिवाय यामध्ये एरंडमूळ आणि कुचला या दोन वनौषधींचा अंतर्भाव केला असल्यामुळे संधिवाताबरोबरच आमवात या विकारावरही क्युअरऑन प्लस हे प्रभावी आहे. हे रोलऑन स्वरूपातही उपलब्ध असल्याने प्रवासात वापरण्यासाठी किंवा खेळाडूंना सोबत ठेवण्यासाठीही ते उपयुक्त आहे. पाठ, कंबर दुखत असेल तर स्वात:च स्वत:ला क्युअरऑन लावणं यामुळे शक्य होतं. त्याचप्रमाणे रोलऑनचा वापर करत असताना स्वाभाविकपणे मसाजही होतो. रोलऑन फॉर्ममुळे तेल सांडण्याचीही भीती नाही. शिवाय यात कोणताही कृत्रिम रंग नसल्याने याचा कपड्यांवर डाग पडत नाही.

 

पावसाळ्याचा आनंद पूर्णपणानं उपभोगायचा असेल तर त्यात उद्भवणाऱ्या सांधेदुखीवर मात करण्यासाठी क्युअरऑन प्लस आपल्या सोबत हवंच.

 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@