एसबीआयने ऑनलाईन व्यवहारांवरील शुल्क हटवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2019
Total Views |

 


नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) शुक्रवारी आईएमपीएस शुल्क आकारणा करणे बंद करण्याची घोषणा केली. १ ऑगस्ट २०१९ पासून हे शुल्क आकारले जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे इंटरनेट बॅंकींग आणि मोबाईल बॅंकींगद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर आता यापुढे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

१ जुलैपासून आरटीजीएस आणि एनईएफटीवरील शुल्क हटवले

यापूर्वी एसबीआयतर्फे आरटीजीएस आणि एनईएफटी शुल्क हटवण्यात आले आहे. त्यानंतर आता खातेधारकांना ऑनलाईन फंड ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे.

 

शाखेतील व्यवहारांमध्ये घट

बॅंकेच्या शाखेत केल्या जाणाऱ्या व्यवहारांवरील शुल्कही हटवण्यात आले आहे. त्याऐवजी आता बॅंकेत केल्या जाणाऱ्या १ हजारापर्यंतच्या फंड ट्रान्सफर व्यवहारांतील शुल्क माफ केले जाणार आहे. इमीडिएट पेमेंट सर्विस (आईएमपीएस) म्हणजे मोबाईल, इंटरनेट बॅंकींगद्वारे खातेधारक सेवा वापरातात. आईएमपीएस द्वारे ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्याच्या खात्यात त्वरीत पैसे ट्रान्सफर केले जातात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@