चीनी सैन्याच्या भारतीय सीमेवरील कुरापती वाढल्या
महा एमटीबी   11-Jul-2019

 

लडाख : ६ जुलै रोजी तिबेट येथील अध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांचा जन्मदिवस होता, जो जम्मू काश्मीरच्या लडाख सीमेवरील बौद्ध धर्मीय मोठ्या उत्साहात साजरी करतात. लडाख च्या दक्षिण-पूर्व भागात 'लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल' जवळ कोयुल, डेमचोक आणि डुंगती या गावात राहणाऱ्या बौद्ध उपासकांनी यावर्षीही या उत्सवाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये भारतीय तिरंगा, बुद्धिस्ट फ्लॅग आणि तिबेटी फ्लॅग एकाच वेळी फडकविले जातात. गेली कित्येकवर्षे हा उत्सव साजरी केला जातो परंतु यंदाच्या वर्षी चीनमधील पीएएल तैनात जवानांनी हा उत्सव साजरी करू नये असा दबाव आणल्याचे स्थानिक नागरिकांकडून कळते. स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे चिनी सैनिक लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल पासून ६ किलोमीटरपर्यंत भारतीय सीमेत घुसखोरी करून स्थानिकांवर उत्सव साजरी करू नये यासाठी धमकावत होते. हे सैनिक उत्सव सुरु असताना त्या ठिकाणी चिनी झेंडा फडकावून त्या क्षेत्रावर आपला हक्क असल्याचे सांगत होते.
 
इंडस नदीजवळील परिसरात चीनने पुन्हा घुसखोरी करून त्याठिकाणी चिनी झेंडे लावले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी सुरक्षा विभागला कळविले आहे. वारंवार चिनी सैनिक याभागात घुसखोरी करत असल्याचे याभागात राहणाऱ्या स्थानिकांकडून कळते. 

चीनच्या या कृतीवरून असे लक्षात येते कि, चीनने घुसखोरी करून पुन्हा एकदा भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही लडाख मधून आंतरराष्ट्रीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न चीनने केला होता. आयटीएपीच्या जवानांनी चीन हा प्रयत्न रोखला होता. यावेळेस चीनच्या या हरकतीवर अजूनही भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आल्याचे कळत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat