काश्मीरमध्ये लष्कराच्या भरतीसाठी हजारो तरुणांचा सहभाग
महा एमटीबी   11-Jul-2019भारताच्या पराभवानंतर जल्लोष करणाऱ्या फुटीरतावाद्यांना मोठी चपराक

 

श्रीनगर : विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी जल्लोष केला होता. मात्र याच काश्मीर खोऱ्यातून एक सकारात्मक बाब समोर आली असून देशाची सेवा करण्याची संधी मिळण्यासाठी येथील तरुण हजारोंच्या संख्येने लष्कराच्या भरतीमध्ये सहभागी झाले होते.


बारामूला जिल्ह्यातील हैदरबेग व पाट्टन येथे काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांसाठी बुधवारी भारतीय लष्करातर्फे भरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल ५ हजार तरुणांनी यात सहभाग नोंदवत देशसेवा करण्यासाठी आम्हालाही संधी देण्यात यावी यासाठीचा दावा केला. लष्कराच्या भरतीसाठी तरुणांनी दर्शविलेला सहभाग हा फुटीरतावाद्यांसाठी मोठी चपराक असल्याचे मानले जात आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat