व्यापाऱ्‍यांसाठी राज्य सरकारची अभय योजना
महा एमटीबी   08-Jun-2019




मुंबई : प्रलंबित कर, व्याज, दंड तसेच प्रलंबित विलंब शुल्क यांचा ठराविक प्रमाणात भरणा केल्यास नोंदित व अनोंदित व्यापाऱ्‍यांची उर्वरित रक्कम माफ करण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत ३० जुन २०१७ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या ११ कायद्यांतर्गत देय कर थकबाकीसाठी या अभय योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून, १ एप्रिल २०१९ ते ३० जून २०१९ या पहिल्या टप्प्यात विवादित व अविवादित रकमेचा भरणा करून अर्ज केल्यास मिळणारी सवलत ही दुसऱ्या टप्प्याच्या कालावधीत म्हणजेच १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान मिळणाऱ्या सवलतीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत विक्रीकर कक्षेत बसणाऱ्या ज्या व्यापाऱ्‍यांचे कर थकित आहेत, अशा नोंदित व अनोंदित व्यापाऱ्‍यांनी पहिल्या टप्प्यात आवश्यक रकमेचा भरणा करून थकित करापासून मुक्ती करून घेण्याचे आवाहन राज्य कर विभागाने केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat