मंत्रालयात साजरा होणार लोकशाही दिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2019
Total Views |



मुंबई : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. १० जून, २०१९ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबातची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

 

राज्यातील शासकीय, निम-शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संदर्भात मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत अशा अर्जदारांनी दि. १० जून रोजी सकाळी ११ वाजता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षात उपस्थित रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील अर्जदारांना मंत्रालय लोकशाही दिनात मुख्यमंत्री यांच्या समक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे, असेही सामान्य प्रशासन‍ विभागातर्फे एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@