ढोलताशांच्या गजरात पार पडला शिवराज्याभिषेक सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019
Total Views |



रायगड : महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवारी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड किल्ला सजवण्यात आला. ढोल-ताशे, लेझीम आणि पोवाड्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळेस सोहळ्याला खासदार संभाजीराजे (कोल्हापूर), खासदार उदयनराजे भोसले तसेच विविध देशाचे राजदूत यावेळी उपस्थित होते.

 

शिवराज्याभिषेक सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहिलेल्या चीन, पोलंड आणि बल्गेरियाच्या राजदुतांनी मराठीत मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवराय हे केवळ हिंदुस्थानाचे नव्हे तर संपुर्ण जगाचे आदर्श आहेत अशा शब्दात छत्रपतींचा गौरव केला.

 

रायगडाला वाहून घेतल तसे शेतकऱ्यांसाठी समर्पित होणार : छत्रपती संभाजीराजे

 

किल्ले रायगडसह महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनसाठी जसे वाहून घेतले आहे त्याप्रमाणे राज्यातील दुष्काळाच्या झळा लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी समर्पित होणार असल्याचे अभिवचन रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छ्त्रपती संभाजीराजे यांनी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहोळयाप्रसंगी दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@