पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019
Total Views |



दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘ग्रीन आयडिया’ विशेषांकाचे प्रकाशन


ठाणे : जागतिक तापमानवाढीचे चटके आपल्याला लागण्यास सुरुवात झाली असून आपले आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचे रक्षण करायचे असल्यास वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘ग्रीन आयडिया २०१९’ या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलतना केले.

 

‘ग्रीन आयडिया २०१९’ या पर्यावरणीय महोत्सवाचा दुसरा दिवस ठाण्यात गुरुवारी पार पडला. यावेळी सायंकाळी पार पडलेल्या कार्यक्रमात खारगे यांच्या हस्ते दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘ग्रीन आयडिया’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ’यंदाचा पर्यावरण दिन ठाण्यात’ या घोषवाक्यासह गेल्या दोन दिवसांपासून दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘ग्रीन आयडिया २०१९’ हा महोत्सव ठाण्याच्या शिवाजी मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला ठाण्याचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.यावेळी खारगे यांच्या हस्ते बीएनएचएसच्या शास्त्रज्ञ तुहिना कट्टी यांना ‘ग्रीन अव्हेंजर्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ‘ग्रीन आयडिया’ या विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी महोत्सवामध्ये मांडण्यात आलेल्या विविध संस्थांच्या प्रदर्शनाला भेट दिली.

 

दै. ‘मुंबई तरुण भारत’ने आयोजित केलेला हा पर्यावरण महोत्सव आणि त्या माध्यमातून वन्यजीव संशोधकांना दिलेल्या व्यासपीठाचे खारगे यांनी मनस्वी कौतुक केले.या विशेषांकामध्ये प्रसिद्ध वन्यजीव संशोधकांच्या लेखांचा समावेश आहे. या कार्यक्रमानंतर ‘पक्षी स्थलांतर’ या विषयावर शास्त्रज्ञ तुहिना कट्टी यांच्याशी मुक्त संवाद पार पडला. त्यानंतर सागरी जीवांविषयी प्रदीप पाताडे यांनी पर्यावरणप्रेमींना माहिती दिली, तर शेवटच्या सत्रात ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर शैलेंद्र सिंग राजपूत यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 

महोत्सवात आज

 

दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘ग्रीन आयडिया २०१९’ या महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सागरी कासवांच्या रंजक गुजगोष्टी कासवतज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर आणि कासवमित्र मोहन उपाध्ये यांच्या अनुभवांतून उपस्थितांना ऐकायला मिळतील. शिवाय ज्येष्ठ वन्यजीव संशोधक भाऊ काटदरे यावेळी खवले मांजरांच्या विश्वाचे गुपित उलगडतील. तसेच संदीप सावंत दिग्दर्शित ‘नदी वाहते’ या चित्रपटाचे प्रदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@