राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण
महा एमटीबी   03-Jun-2019 


अहमदाबाद : गुजरातमध्ये एक संतापजनक घटना घडली. पाण्याची तक्रार घेऊन गेलेल्या राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्तीला भाजपच्या आमदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या सर्व घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बलराम थवानी असे या भाजप आमदाराचे नाव असून तो नरोडाचा आमदार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर्ड प्रमुख नीतू तेजवानी या पाण्याच्या पाईपलाईन विषयीची तक्रार घेऊन थवानी यांच्या कार्यालयात गेल्या. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. काहीवेळातच या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.

 

माझ्याकडून चूक झाली असून या घडलेल्या प्रकाराबाबद खेद वाटत आहे. माझ्यावर पहिल्यांदा हात उचलण्यात आला. त्यानंतर मी आत्मरक्षणासाठी हात उचलल्याचे थवानी यांनी सांगितले. दरम्यान, थवानी यांनी झालेल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागण्याची तयारीही दर्शवली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat