जेएनपीटी ठरले भारतातील सर्वोत्तम बंदर
महा एमटीबी   29-Jun-2019मुंबई : जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी हे भारतातील सर्वोत्तम बंदर ठरले आहे. जेएनपीटीला यंदाचा बेस्ट पोर्ट ऑफ द इयर - कंटेनरहा पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या चौथ्या 'भारतीय सागरी पुरस्कार २०१९' सोहळ्यात जेएनपीटीला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच सागरी क्षेत्रातल्या तीस वर्षाच्या गौरवशाली सेवेबद्दल जेएनपीटीचा विशेष गौरवही यावेळी करण्यात आला.


बंदरातून होणारी मालाची उलाढाल, वृद्धी, विस्तार आराखडा, नवे उपक्रम, ई-व्यापार, ग्राहकांचे समाधान यासारख्या विविध निकषांच्या आधारे सर्वोत्तम बंदराची निवड केली जाते. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat