मुंबईचा 'क्वीन्स नेकलेस' काळवंडला
महा एमटीबी   28-Jun-2019
मोठ्या प्रमाणात सांडपाणी समुद्रात मिसळत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

 

 मुंबई (विशेष प्रतिनिधी ) :  मुंबईचा प्रसिद्ध  'क्वीन्स नेकलेस'चा समुद्र पुन्हा एकदा काळवंडला आहे. शुक्रवारी सकाळी मरीन डाईव्हच्या एअर इंडिया इमारतीच्या समोरील किनारपट्टीलगत काळ्या रंगाचे पाणी समुद्रात मिसळताना दिसले. राॅनित दत्ता यांनी टायडन्ट हाॅटेलमधून काढलेल्या छायाचित्रामध्ये समुद्रामध्ये सांडपाणी मिसळत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही घटना घडत असल्याची माहिती 'मरीन लाईफ आॅफ मुंबई'चे प्रदीप पाताडे यांनी दिली. समुद्राला मिळणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीमधून हे सांडपाणी बाहेर पडत असल्याचे प्राथमिक निदर्शनास येत आहे. यामुळे मरीन डाईव्हच्या समुद्रामध्ये सांडपाण्याचे मोठे वर्तुळ तयार झाले आहे. दत्ता यांनी काढलेल्या छायाचित्रामध्ये हे पाणी तीन ठिकाणाहून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे सांडपाणी नेमके कुठून येत आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat