मुंबईमध्ये ३ सट्टेबाज अटकेत
महा एमटीबी   27-Jun-2019मुंबई : विश्वचषक सामन्यासाठी सट्टा लावणाऱ्या बुकींवर माटुंगा पोलिसांनी कारवाई केली आहे. लोटसबुक २४७ डॉट कॉम या संकेतस्थळावरून ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दादरच्या एका हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

त्याचसोबत मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेला ज्ञानेश्वर खरमाटे यालाही अटक करण्यात आली. तर मुलुंडमध्ये देखील डायमंडएक्स नाईन डॉटकॉम या संकेतस्थळावरून सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक कऱण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यामातून देशभरातून ऑनलाईन सट्टा सुरू होता. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून अजून अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat