पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वशक्तीशाली नेते : ट्रम्प, पुतीन पिछाडीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह असताना भारतीयांसाठी आणखी एक अभिमानाची वार्ता आहे. 'ब्रिटीश हेरॉल्ड' या मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्ती (वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल पर्सन २०१९) म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक मते मिळाली आहे.

 

वाचकांनी मोदी यांना सर्वाधिक पसंती देत जगातील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्ती म्हणून त्यांची निवड केली आहे. ब्रिटीश हेरॉल्डने घेतलेल्या या पोलमध्ये रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा समावेश होता. सर्व दिग्गज नेत्यांवर मात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक शक्तीशाली नेते बनले.

 

तब्बल पंचवीसहून जगभरातील सर्वशक्तीशाली व्यक्तींचा सामावेश मासिकातर्फे सर्वेक्षणासाठी करण्यात आला होता. अशा व्यक्तीची निवड करण्यासाठी वाचकांना ओटीपी देण्यात आला होता. या मेसेज अंतर्गत एका वाचकाला एकाचवेळी मतदान करता येऊ शकणार होते. हेरॉल्डच्या वाचकांना आपला आवडती व्यक्ती निवडण्याची सुविधा होती. वाचकांनी या पोलमध्ये सहभागी होण्यासाठी उंदड प्रतिसाद दिला त्यात भारतीयांचा मोठा सहभाग होता.

 

मतदानावेळी ब्रिटीश हेरॉल्डची वेबसाइट क्रॅश झाली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ३०.९ टक्के मतदान मिळाले. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना २९.९ टक्के मते मिळाले असून ते मोदी यांच्यानतंर दुसऱ्या स्थानी आहेत. २१.९ टक्के मते मिळालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिसऱ्या स्थानी राहिले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना १८.१ टक्के मिळाले असून ते चौथ्या स्थानी आहेत. परिणामी ब्रिटिश हेरॉल्डच्या जुलै अंकातील मुखपृष्टावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो झळकणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@