आज विधिमंडळात चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |

 

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तार आणि दुष्काळाच्या मुद्यावरून गदारोळ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा दिलेल्या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. त्याशिवाय गिरीश बापट, अनिल गोटे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रतापराव चिखलीकर, उन्मेश पाटील, हेमंत पाटील तसंच सय्यद इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांचे राजीनामेही स्वीकारल्याचं, बागडे यांनी सांगितलं.

राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल काल विधान सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला. या अहवालात, २०१८-१९ च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत सात पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. कृषीच्या दरात दोन पूर्णांक आठ दशांश टक्के तर उद्योग क्षेत्रात सात टक्क्यांनी घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राच्या दरात नऊ पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाज आहे. २६ टक्क्यांपेक्षा अधिक सरकारी जागा रिकाम्या असल्याचं, या अहवालातून स्पष्ट झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षात सतरा लाख ८४ हजार घरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम उपलब्ध करून दिल्याची माहिती, या अहवालात देण्यात आली आहे.

 
अहवालातील आकडेवारीची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. दरम्यान, आज विधिमंडळात चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@