संजय दत्तचे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |



हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते बाबाया त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. संजय एस दत्त प्रॉडक्शन्सखाली त्यांनी अशोक सुभेदार व आरती सुभेदार यांच्या ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सबरोबर त्यांनी चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सने याआधी बकेट लिस्टया माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेल्या तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. बाबाचित्रपटाचे पहिले पोस्टर आज निर्मात्यांनी प्रकाशित केले. हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

बाबाचित्रपटात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि तनु वेडस मनुमध्ये प्रमुख भूमिका बजाविलेला दीपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत असेल. त्याचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. 

संजय दत्त यांनी ट्विट करून आपले वडील आणि महान कलाकार सुनील दत्त यांना हा चित्रपट समर्पित केला आहे. "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' जी माझ्या मागे प्रत्येक बाबतीत खंबीरपणे उभी राहिली अशा व्यक्तीस समर्पित करत आहोत. लव्ह यू डॅड!," संजय म्हणतो. मान्यता दत्तने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' आम्ही सुनील दत्त साहेबांना समर्पित करत आहोत. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित होत गेला."


बाबाचे दिग्दर्शक राज आर गुप्ता म्हणाले, “भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करते, याची ही कडू-गोडप्रसंगांनी भरलेली कथा आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@