स्टार्टअप कंपन्यांना नव्या संकल्पना मांडण्याची संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |



रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे 'न्यु इंडिया स्टार्टअप कॉनक्लेव्हचे आयोजन

 

मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि 'अटल इन्युबेशन सेंटर'तर्फे 'न्यु इंडिया स्टार्टअप कॉनक्लेव्ह' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या परिषदेत कनेक्ट, शेअर आणि ग्रो' कृषी, माहिती संचार तंत्रज्ञान (शैक्षणिक व आरोग्य), सामाजिक उपक्रम या क्षेत्रात रोजगारनिर्मिती करणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना संधी देण्यात येणार आहे.

 

निती आयोगाच्या संकल्पनेतील 'नवा भारत' या संकल्पनेचे पहिले पाऊल असलेल्या कनेक्ट, शेअर आणि ग्रो' परिषदेला केंद्रीय कृषी कल्याण मंत्री परषोत्तम रुपाला, राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 

ही एकदिवसीय परिषद शनिवार, दि. २२ जून रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन, भाईंदर पश्चिम, ठाणे ४०११०६ येथील ज्ञाननैपुण्य केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहीतीसाठी ०२२-२८४५०१०९ किंवा mailto:[email protected] या ईमेलवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@