अखेर ...नच्या गॉट अ गर्लफ्रेंड, गाणे प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |



महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात थोडक्यात टिनेजर्सच्या आयुष्यात गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळणे म्हणजे एक अभिमानाची गोष्ट समजली जाते. याच पार्श्वभूमीवरचा 'गर्लफ्रेंड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र त्याआधी आज या चित्रपटातील नच्या म्हणजेच नचिकेतला अखेर त्याची अलिशा, त्याची गर्लफ्रेंड मिळाली म्हणून त्याचा आनंद व्यक्त करणारे एक भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे.
'नच्या गॉट अ गर्लफ्रेंड' हे नवीन गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

हे गाणे चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अमेय वाघ याने सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहे. गाण्याचे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले असून जसराज जोशी आणि सौरभ भालेराव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तर जसराज जोशीनेच गाणे गायले देखील आहे. गाण्यातील नृत्य दिग्दर्शन राहुल आणि संजीव यांनी केले आहे. दरम्यान या आधी या गाण्याची झलक "माझा नचू कसा धिंगाणा घालतोय बघा" असे म्हणत सई ताम्हणकरने शेअर केली होती.

उपेंद्र सिधये ज्या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकत आहे तो गर्लफ्रेंड हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्या आधी चित्रपटामध्ये काय काय मजा मस्ती आहे याची झलक आपल्याला या गाण्यामधून आणि आधी प्रदर्शित झालेल्या टीजर्समधून पाहायला मिळत असल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे हे निश्चित.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@