एनसीपीए सादर करत आहे म्युझीक मिरर : पु. ल. देशपांडेंवरील डॉक्युमेंट्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |



५० व्या वर्षाच्या उत्सवाचाच एक भाग म्हणून नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) द्वारा पु. ल. देशपांडेंवरील डॉक्युमेंट्री 'म्युझीक मिरर' चे २१ जून २०१९ रोजी एनसीपीएमधील वेस्ट रूममध्ये आयोजन करण्यात आले आहे.

पु. ल. देशपांडे (१९१९ - २०००), प्रतिष्ठित लेखक, दिग्दर्शक, नाटककार, पटकथा लेखक, अभिनेते, संगीतकार आणि हार्मोनियम वादक, एनसीपीएचे मानद दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

या डॉक्युमेंट्री चे शीर्षक 'पुल' आहे, कारण पु. ल. देशपांडे महाराष्ट्रातील आणि जगभरातील लोकांमध्ये पुल म्हणून लोकप्रियपणे ओळखले जात होते. पु. ल. देशपांडे यांचे बहुआयामी जीवन, त्याच्या स्वतःच्या शब्दांत, हा चित्रपट चित्रित करतो. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन भूपेंद्र देवरे आणि निर्मिती चित्रपट विभागाने केली आहे.

कार्यक्रम - एनसीपीए सादर करत आहे म्युझीक मिरर : पु. ल. देशपांडेंवरील डॉक्युमेंट्री

दिनांक आणि दिवस - शुक्रवार, २१ जून २०१९

वेळ - वेस्ट रूम, एनसीपीए

विनामूल्य प्रवेश

मेम्बर्ससाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@