म्हाडा करणार वसाहतींचा पुनर्विकास : विकासकानी प्रकल्प रखडविल्याने निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |




मुंबई : म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास विकासकांनी रखडविल्याने अखेर म्हाडा प्राधिकरणाने तब्बल ५६ वसाहतींच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. यासाठी म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. ही समिती पुनर्विकासाबाबत निर्णय घेणार आहे.

 

शहर आणि उपनगरात म्हाडाच्या ५६ वसाहती असून काही वसाहतीतील सोसायट्याचा पुनर्विकास विकासकांनी रखडविला असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहे. काही विकासक प्रकल्प राबविण्यासाठी सक्षम नसल्याने वसाहतींचा पुनर्विकास म्हाडाने करावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे. याचा विचार करून म्हाडा प्रशासनाने प्रकल्प रखडलेल्या वसाहतींचा पुनर्विकास स्वतः करण्याचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला होता.

 

या प्रस्तावाला झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार जे रहिवाशी म्हाडाकडे वसाहतीचा पुनर्विकास करण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन येतील, त्या वसाहतीचाच पुनर्विकास म्हाडा करेल, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.

 

मोतीलाल नगरातील अनधिकृत बांधकामांवर पंधरा दिवसात कारवाई

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर अनधिकृत बांधकामांचे आगार बनले आहे. काही महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे बांधकाम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत दोन कामगार मृत्युमुखी पडले होते. या घटनेची दाखल घेऊन म्हाडाने मोतीलाल नगरमधील अनधिकृत बांधकामांवर पंधरा दिवसात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह अनधिकृत बांधकामास पाठबळ देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@