विरोधकांनी नवे तंत्रज्ञान अवगत करावं : फडणवीस यांचा टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |



अर्थसंकल्प फुटला नाहीच : मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

 

मुंबई : सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्थसंकल्पांबाबत वेगवान अपडेट्स जनतेपर्यंत पोहोचवत आहे, त्यावरून विरोधकांनी गैरसमज करून घेत अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

विधानसभेत अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत असतानाच अर्थसंकल्प ट्विटरवर फुटल्याचा आरोप केला. यावेळी विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यानंतर सभात्यागही केला, दरम्यान, अर्थसंकल्पाचा पहिला भाग संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपावर सरकारच्यावतीने स्पष्टीकरण दिले आहे.

 


अर्थसंकल्प सादर होत असतानाच त्यातील महत्त्वाच्या तरतुदी ट्विटरवर पोस्ट करण्यात येत आहेत. अर्थमंत्र्यांचे भाषण आणि या पोस्टमध्ये दोन ते तीन मिनिटांचे अंतर आहे. त्यापूर्वी एकही पोस्ट आधी शेअर केलेली नाही. सरकार नव्या माध्यमाच्या वापराद्वारे अधिक जलद अपडेटस् आणि माहीती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे अर्थसंकल्प ट्विटरवर फुटला हा विरोधकांचा आरोप निरर्थक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असतानाही अशाप्रकारे ट्विटरच्या माध्यमाचा वापर करण्यात आला होता, असेही मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले. आमच्याप्रमाणे विरोधकांनीही नवं तंत्रज्ञान आत्मसात करावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. विरोधकांनी सभागृहात यावे व अर्थसंकल्प जाणून घ्यावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@