होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-२३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |



चैतन्यशक्ती ही भौतिक अस्तित्व नसलेली, पण गतिशील शक्ती आहे. जेव्हा माणूस कुठलीही अनुचित गोष्ट करतो, शारीरिक व मानसिक पातळीवरचुकीच्या गोष्टी करत असतो, तेव्हा या चैतन्यशक्तीच्या कामात अडथळा येतो. चैतन्यशक्ती थोडीशी कमजोर होते.


होमियोपॅथीक केस टेकिंग करत असताना रुग्ण स्वत:बद्दल जेव्हा बोलत असतो, त्यावेळी तो स्वत:ला होणार्‍या मुख्य तक्रारींबद्दल प्रामुख्याने सांगत असतो. ज्या तक्रारी किंवा जी लक्षणे व जी मानसिक स्थिती त्याला सर्वात जास्त त्रास देत असते, त्याबद्दल तो डॉक्टरांना सविस्तर सांगतो. प्रत्येक रुग्ण हा काही भरभरून लक्षणे सांगेल असेही नसते, त्याचप्रमाणे प्रत्येक रुग्ण हा त्याची फक्त मानसिक लक्षणे सांगेल असेही नसते. काही रुग्ण केस टेकिंगच्या वेळी सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त शारीरिक व्याधी, शारीरिक लक्षणे व त्यामुळे त्याला होणारे त्रास याच बाबतीत बोलत राहतात. त्यांना आपण त्यांच्या स्वभावाबद्दल किंवा मानसिक स्थितीबाबत विचारले असता ते त्याबद्दल फारसे काहीही सांगत नाहीत. या उलट काही मंडळी स्वत:च्या शारीरिक तक्रारी कितीही असल्या तरी, त्या एका मिनिटात सांगून मोकळे होतात व नंतर स्वत:च्या शारीरिक ताण-तणावाबद्दल बोलत राहतात आणि काही रुग्ण स्वत:चे मानसिक वा शारीरिक त्रास न सांगता त्यांचे नातेवाईक, शेजारी, मित्र इत्यादींच्या त्रासाबाबत किंवा त्यांच्याबद्दल जास्त बोलतात, असेही अनुभव चिकित्सकाला येत असतात. हे रुग्ण असे का वागत असतात, हे आपण हे जाणून घेऊया. याचे उत्तर आपल्याला चैतन्यशक्तीच्या (vital force) अभ्यासात मिळते. चैतन्यशक्तीचा अभ्यास करताना आधी आपण पाहिले आहे की, ही ऊर्जा शरीरातीलअवयव, शरीराचे नियमित कार्य व मन यांना सुरळीत ठेवत असते. याच शक्तीमुळे शरीरातील सर्व कार्यांची व्यवस्थित सांगड घातली जात असते. ज्यावेळी कुठल्याही प्रकारे 'vital force' किंवा चैतन्यशक्ती दुखावली जाते किंवा कमकुवत होत त्यावेळी माणसाला आजार होतो.

 

चैतन्यशक्ती ही भौतिक अस्तित्व नसलेली, पण गतिशील शक्ती आहे. जेव्हा माणूस कुठलीही अनुचित गोष्ट करतो, शारीरिक व मानसिक पातळीवरचुकीच्या गोष्टी करत असतो, तेव्हा या चैतन्यशक्तीच्या कामात अडथळा येतो. चैतन्यशक्ती थोडीशी कमजोर होते. कमकुवत झालेली चैतन्यशक्ती मग हे शारीरिक व मानसिक नियंत्रण नीटप्रकारे ठेऊ शकत नाही. त्यामुळे मग शरीराची सुसूत्रता निघून जाते व याचाच परिणाम म्हणून मग शरीर व पेशी काही लक्षणे व चिन्हे दाखवू लागतात व त्याचबरोबर मानसिक स्थितीमध्येसुद्धा बदल होतो. आता आपल्याला माहीत आहे की, ही चैतन्यशक्ती माणसाच्या प्रत्येक पेशीमध्ये कार्यरत असते, म्हणूनच सुरुवातीला चैतन्यशक्ती प्रतिकार करू लागते, जर बाहेरील शक्ती ही चैतन्यशक्तीपेक्षा कमजोर असेल, तर चैतन्यशक्ती त्यापेक्षा वरचढ ठरते. त्या शक्तीला शरीरात येण्यापासून रोखून तिला प्रतिकारकरते. त्याचमुळे बाहेरून कुठलीही मदत न घेता ही (म्हणजेच होमियोपॅथीक औषध) चैतन्यशक्ती शरीर व मनाचे कार्य सुरळीत करते व आजार बरा करते. परंतु, या सर्वात चैतन्यशक्तीची बरीच ऊर्जा खर्च होते व माणसाला अशक्त वाटू लागते. केस टेकिंगच्या दरम्यान माणूस एखाद्या विशिष्ट तक्रारींबद्दलच का सांगतो, याचे उत्तर याच चैतन्यशक्तीत लपले आहे. त्याविषयी आपण पुढील भागात पाहू. (क्रमश:)

 

- डॉ. मंदार पाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@