संसदेचे अधिवेशन : विरोधक अजूनही पराभवाच्या धक्क्यातच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : १७व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि शपथविधी सोहळाही पार पडला. आता सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास शिल्लक असताना विरोधकांमध्ये संभ्रम कायम आहे.सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र विरोधी पक्षांकडून अशा प्रकारचे कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकते, असे राज्यसभा खासदार पी. एन. पुनिया यांनी सांगितले होते.

 

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला प्रचंड धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष अद्याप पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यामुळे संसदेत सत्ताधारी पक्षाला घेरण्याची पुरेशी तयारीही विरोधी पक्षांनी केली नसल्याचे चित्र दिल्लीत आहे. सरकारविरोधात जाणाऱ्या कुठलाही मुद्दा विरोधकांकडे तूर्त नाही, त्याबद्दल एकमतही मुळीच नाही, असे चित्र आहे. विरोधीपक्षांनी तसे कुठलेही विधान केलेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@