'मिस यू मिस्टर' चित्रपटाच्या ट्रेलरला मिळाले १ मिलियन व्हूज...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2019
Total Views |



मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी बहुचर्चित
मिस यू मिस्टरया आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा सिनेमा २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला होता त्याचबरोबर सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला अल्पावधीतच सर्व सोशल मीडिया साईटसवर १ मिलियन व्हियूज मिळाले असून प्रेक्षक याला प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत.

या चित्रपटातील गीते वैभव जोशी यांनी लिहिली असून आलाप देसाई यांचे संगीत आहे तर सोनू निगम , आनंदी जोशी,आलाप देसाई यांनी गाणे गाईले आहे. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली असून थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने मिस यू मिस्टरया चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. आतापर्यंत ट्रेलरबरोबरच सिनेमाच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सिनेमामध्ये सिद्धार्थ चांदेकर वरुणआणि मृण्मयी देशपांडे कावेरीहे दोघे नवं विवाहित जोडपं आहे असं दिसतंय आणि वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतंय, मग ते यातुन कसा मार्ग काढतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना २८ जूनला सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. हा संपूर्ण सिनेमा 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' वर भाष्य करणारा आहे, जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अश्या सर्वाना हा सिनेमा खूप उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही.

या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर,राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@