'एससीओ' परिषदेत पंतप्रधान मोदींचे पाकला खडेबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |


दहशतवाद पोसणार्‍यांची आर्थिक नाकेबंदी करा - नरेंद्र मोदी 


बिश्केक : येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून नाव न घेता पाकिस्तानला खडे बोल सुनावले. परिषदेत अतिरेक्यांचा मुद्दा उपस्थित करत आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असून दहशतवादाला समर्थन, प्रोत्साहन देणार्‍या, तसेच त्यासाठी वित्तपुरवठा करणार्‍या राष्ट्रांविरोधात बोलण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्टपणे अधोरेखित केले.

 

एससीओ परिषदेत मोदी म्हणाले, "दहशतवाद पसरविण्यासाठी त्यांना समर्थन, प्रोत्साहन आणि आर्थिक मदत करणारे देश जबाबदार आहेत. 'टेररिजम फ्री सोसायटी' झालीच पाहिजे. श्रीलंकेत गेलो होतो, तेव्हा दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. दहशतवादाविरोधात एससीओच्या सर्वच देशांनी एकत्र आले पाहिजे. प्रत्येक देशाने आपल्या भूभागाला सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य मजबूत करणे आवश्यक आहे. हेल्थ केअर, इकॉनॉमिक, पर्यायी उर्जेच्या क्षेत्रात काम करावे लागणार आहे. भारत मेडिकल टुरिझम वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी बहुपक्षीय व्यापार प्रणाली गरजेची आहे. अक्षय ऊर्जेचा भारत सहावा आणि सौर ऊर्जेचा भारत पाचवा सर्वात मोठा उत्पादक देश आहे," असे ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@