महिंद्राने तंत्रज्ञान आधारित मालमत्ता देखभाल कंपनी 'टिईक्यूओ' लॉन्च केली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



मुंबई : महिंद्रा पार्टनर्स या महिंद्रा ग्रूपच्या अब्ज डॉलर्सच्या प्रायव्हेट इक्विटी विभागाने आज टिईक्यूओ ही तंत्रज्ञान आधारित मालमत्ता देखभाल कंपनी लॉन्च केली. भारत आणि जगभरातील रीन्युएबल एनर्जी म्हणजेच अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना ऑप्टिमायझेशन सोल्युशन्स पुरवली जाणार आहेत. महिंद्रा पार्टनर्सतर्फे सध्या महिंद्रा सस्टेन या भारतातील आघाडीच्या सोलार ईपीसी कंपनीसह ग्रूपच्या क्लीनटेक विभागाचे नियोजन केले जाते.

 

टिईक्यूओ ग्राहकांना अत्याधुनिक असेट मॉनिटरिंग सोल्युशन्स, कमाल ऊर्जानिर्मितीचे अल्गोरिदम, सुस्पष्ट रोबोटिक्स, ऑटोमेटड ड्रोन्स, ऑन-ग्राऊंड ऑपरेशन्स आणि मेंटनन्स फ्लीट्स, अशा अत्याधुनिक सेवा देणार आहे. त्याचप्रमाणे, असेट मॅनेजमेंट सर्विसेस, तांत्रिक तज्ज्ञता आणि परफॉर्मन्स अॅनालिसिस सेवाही दिल्या जातील.

 

कंपनीचे टिईक्यूओ हे नाव तीन अक्षरांपासून बनले आहे - टेक्नॉलॉजी, क्वॉलिटी आणि ऑपरेशनन्स. सर्वसमावेशक, तंत्रज्ञानाधारित असेट मॅनेजमेंट पुरवण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षाच या नावातून प्रतित होते. महिंद्रा लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, बिग डेटा, रोबोटिक्स, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत अधिकाधिक परतावा मिळवण्यात रीन्युएबल एनर्जी संसाधनाच्या मालकांना महिंद्रा टिईक्यूओचे साह्य लाभणार आहे.

 

"सस्टेनमधील ओअॅण्डएम विभाग ते एक स्वतंत्र व्यवसाय विभाग आणि आता टिईक्यूओ ही एक स्वतंत्र ओळख... टिईक्यूओची मागील सहा वर्षांतील ही यशस्वी प्रगती पाहून मला आनंद होतो. डिजिटायझेशनमुळे शाश्वत तंत्रज्ञान आणि ग्राहककेंद्रितता अत्यंत महत्त्वाच्या बाबी ठरल्या आहेत. जगभरात तंत्रज्ञानाधारित रीन्युएबल एनर्जी आणि ओअॅण्डएम क्षेत्रात टिईक्यूओ नेतृत्वस्थान मिळवेल, असा मला विश्वास आहे," असे महिंद्रा पार्टनर्सचे मॅनेजिंग पार्टनर पराग शहा म्हणाले.

 

"अवघ्या 6 वर्षांच्या कालावधी 4जीडब्ल्यूपी प्रकल्प अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवांची वाढती परिसंस्था, त्याला सखोल डोमेन तज्ज्ञतेसोबत असलेले दमदार टीमचे पाठबळ यामुळे टिईक्यूओमध्ये आम्ही अतिशय अभिमानाने जागतिक अस्तित्वासह एक सर्वाधिक सर्वसमावेशक अशी रीन्युएबल एनर्जी असेट मॅनेजमेंट कंपनी उभारत आहोत," असे महिंद्रा टिईक्यूओचे सीईओ स्टीव्ह ओडक म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@