इंग्रजी शिकवणार हे गॅजेट : जाणून घ्या किंमत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : नवनवीन तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या शाओमीने खास गॅजेट बाजारात आणले आहे. नव्या गॅजेटद्वारे तुम्ही इंग्रजी भाषा शिकू शकता. 'शाओमी इंग्लिश टिचिंग' हे स्मार्ट असिस्टंटद्वारे कार्यान्वित केले जाते. या गॅजेटची स्क्रीन चार इंची असल्याने हाताळण्यास सुलभ आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.

 

या गॅजेटमध्ये दोन बटणे आणि टचपॅड आहे. इंग्रजी शिकण्याची पद्धत बदलण्याचा विचार शाओमीने केला आहे. या गॅजेटमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी विविध उपलब्ध आहेत. यात व्हॉइस कमांड, गॅजेट लिसनिंग, व्हॉइस आणि व्हिज्युअल सपोर्ट करत आहे. ऑक्सफोर्ड डिक्शनरी, कॉलिस कोबिल्ड अॅडव्हान्स, न्यू एज चायनीस डिक्शनरी, मॉर्डन चायनीस डिक्शनरी, Xinhua डिक्शनरी उपलब्ध आहे.

 

याशिवाय स्पेल करेक्शन, जगभरातील २२४ देशांतील स्थानिक भाषांचाही सामावेश करण्यात आला आहे. इंग्रजी शिकण्यासाठी गॅजेटला इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. याचे ऑफलाईन व्हर्जन फोर जी इंटरनेट किंवा वायफायवर कनेक्ट होऊ शकते. या गॅजेटची किंमत ५ हजार रुपयांपासून ते १० हजारांपर्यंत आहे. गॅजेटचा प्रीसेल १२ जून पासून सुरू होणार असून थेट विक्री १८ जूनपासून केली जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@