आनंदवार्ता ! : बॅंक खातेधारकांना मिळणार या सवलती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने किमान खातेधारकांच्या सोयीसाठी नवी नियमावली लागू केली आहे. आरबीआयच्या नव्या नियमावलीप्रमाणे, १ जुलैपासून चेकबूकसह अन्य सहा प्रकारच्या सोयी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह खातेधारकांना किमान शिल्लक रक्क्म ठेवण्याची सक्तीही बॅंका करू शकणार नाहीत. मूलभूत बचत बँक ठेवी खाते सुरू ठेवण्यासाठी यापूर्वी काही रक्कम खात्यात शिल्लक असणे आवश्यक होते. नव्या नियमावलीनुसार, अशा किमान शिल्लकीची आवश्यकता भासणार नाही.

 

खातेधारकांना मिळणार या सुविधा

 

डिपॉझिट्स : खातेधारकांना खात्यात रक्कम जमा करण्याची सोय संबंधित बॅंकेच्या कोणत्याही शाखेतून जमा करण्याची सुविधा आहे. याशिवाय एटीएम आणि मशिनद्वारे रक्कम जमा करण्यासाठीही सुविधा उपलब्ध आहे.

 

ई-डिपॉझिट्स : आरबीआयच्या नियमावलीद्वारे खातेधारकांना धनादेश, इलेक्ट्रोनिक सेवा, केंद्रीय आणि राज्य स्तरीय एजन्सीच्या माध्यमाद्वारे रक्कम जमा करण्याची सुविधा आहे.

 

डिपॉझिट्स मर्यादा : खातेधारकांना त्यांच्या मूलभूत बचत बँक ठेव खात्यात महिन्यातून तीनवेळा रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. याशिवाय रक्कमेवर कोणतिही मर्यादा नाही.

 

एटीएम सुविधा : मूलभूत बचत बँक ठेव खातेधारकांना चार वेळा खात्यातून रक्कम काढण्याची सोय उपलब्ध आहे. यात एटीएमद्वारे काढली जाणाऱ्या रक्कमेबद्दलही उल्लेख करण्यात आला आहे.

 

एटीएम कार्ड : नव्या नियमावलीनुसार, सर्व खातेधारकांसाठी एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड देणे अनिवार्य आहे. याबद्दल बॅंक एटीएमसाठी वार्षिक किमान शुल्क आकारणी करू शकतात.

 

चेकबुक : मूलभूत बचत बँक ठेव खातेधारकांना कोणत्याही शुल्काविना चेकबुक वितरीत करावे लागू शकते. त्यासाठी ग्राहकांना कोणत्याही किमान शुल्काची आवश्यकता भासणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@