राष्ट्रवादीच्या प्रफुल्लवर ईडीची तलवार; लवकरच तिहार वारी?
महा एमटीबी   01-Jun-2019 


नवी दिल्ली : दीपक तलवार अवैध विमान खरेदी करारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले. ६ जून रोजी हजर होण्याचे आदेश ईडीने पटेल यांना दिले आहेत.

 

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात दुबईतून उद्योजक राजीव सक्सेना आणि कॉर्पोरेट लॉबिस्ट दीपक तलवार यांना काही दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. भारतीय तपास संस्थेने दुबईतील या दलालांना अटक करून भारतात प्रत्यार्पण केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat