राजीव गांधींविरोधातील वक्तव्याप्रकरणी मोदींना निवडणूक आयोगाची क्लिन चीट
महा एमटीबी   08-May-2019नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या थेट विधानानंतर कॉंग्रेस आणि विरोधकांनी त्यांच्याविरोधात टीका करण्यास सुरुवात केली होती. निवडणूक आयोगात या वक्तव्याविरोधात टीका करण्यात आली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणी क्लिनचीट मिळाली आहे.

 

निवडणूक आयोगाने हे प्रकरण निकाली काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्लीन चिट दिली आहे. या वक्तव्यामुळे मोदींनी आचारसंहिता भंग केली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन असे संबोधले होते. त्यानंतर कॉंग्रेसी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदींविरोधात रान उठवले होते. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भ्रष्टाचारी नंबर वन आहेत, असे मोदींनी म्हटले होते. राहुल गांधी यांना उद्देशून त्यांनी ही टीका केली.


 

मोदी म्हणाले की, "जो पक्ष पहिल्या टप्प्यातील मतदानाअगोदरच स्वतःला पंतप्रधान पदाचा दावेदार मानत होती, ती आता हे मान्य करू लागली आहे की आपण तर उत्तर प्रदेशात केवळ मते खाण्यासाठी निवडणूक लढवत आहे. आज काँग्रेसची जी अवस्था झाली आहे ते याचे उत्तम उदाहरण आहे."

 

आता मोदींना त्यांच्या राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून क्लीन चिट मिळाली आहे. हे वक्तव्य करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवरून उत्तर दिले होते. आता लढाई संपली आहे, माझ्या वडिलांवर केलेले आरोपही तुम्हाला वाचवू शकत नाहीत असा निशाणा त्यांनी साधला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat