'जय श्रीराम'च्या घोषणा ; ममता भडकल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2019
Total Views |



कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ममतांचा ताफा जात असताना 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर ममता भडकल्या असल्याचा हा व्हिडिओ पश्चिम बंगाल भाजपच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओची चर्चा रंगल्यानंतर तृणमूल काँग्रेसने हा व्हिडिओ बनावट असून भाजप त्याच्या नेहमीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.

 

पश्चिम बंगालमधील चंद्रकोण येथील आरामबाग येथील उमेदवाराच्या प्रचारार्थ एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या. ममतांनी या कार्यकर्त्यांवर शिव्या देत असल्याचा आरोप केला आहेत. पश्चिम बंगालच्या भाजपच्या ट्विटर हँडलवरून या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “जय श्रीरामच्या घोषणांनी दीदी इतक्या नाराज का आणि या घोषणांना शिव्या का म्हणतात?,” असे कॅप्शनही देण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@