मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हू की...
महा एमटीबी   30-May-2019नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी सात वाजता पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यासाठी सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. यात बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. 

शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या बिमस्टेकदेशांचे प्रमुख उपस्थित आहेत. २०१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेतेही यावेळी उपस्थित आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat