'जेसीबी'ने मानले भारतीयांचे आभार : जाणून घ्या जेसीबी कंपनीविषयी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2019   
Total Views |




'हॅशटॅग जेसीबी की खुदाई'ने #JCBkiKhudai सोशल मीडियावर गेले काही दिवस नुसता धुमाकूळ घातला आहे. हैदराबाद येथे एका खासदाराने भारतीय लोकांकडे बराच वेळ असून जेसीबीचे खोदकाम सुरू असेल तेव्हा ते बघायला गर्दी होत असते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर जेसीबीकी खुदाई हा ट्रेण्ड सुरू झाला. याबद्दल आता जेसीबी कंपनीनेही भारतीयांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.

'जोसेफ सिरील बामफोर्ड' आहे पूर्ण नाव

रस्त्यावरील खोदकाम असो, बांधकाम, नालेसफाई, बर्फाच्छादीत प्रदेश असो वा अन्य कोणतेही काम पिवळ्या रंगाचे हे मशीन दोन्ही बाजूंनी माती उचलण्याचे काम करू शकते. काही ग्रामीण भागात त्याला पोकनेल किंवा बॅकहो लोडरही (अपभ्रंश बुल्डोझर) म्हणत. त्यानंतर काहीकाळाने जेसीबी हा शब्द प्रचलित झाला. जेसीबी या शब्दाचा अर्थ आहे 'जोसेफ सिरील बामफोर्ड’'... १९४५ मध्ये जोसेफ सिरील बामफोर्ड यांनी या इंजिनांचा शोध लावला. १९७९ मध्ये एक भागधारक कंपनी म्हणून सुरू करण्यात आलेली ही कंपनी आता युके येथील जे. सी. बामफोर्ड एक्सकेव्हेटर्स उत्खनन आणि बांधकाम क्षेत्रातील साहित्यासाठी लागणारी मशिनरी तयार करते. जेसीबी इंडिया ही भारतातील त्यांची उपकंपनी आहे.

 

भारतात आहे सर्वात मोठी कंपनी

चार दशकांपूर्वी बॅकहो लोडरचे (बुल्डोझर) उत्पादन भारतात करण्यात आले होते. त्यानंतर सुमारे ५० वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये त्याचे उत्पादन करण्यात आले. भारतात दिल्ली येथील The Ballabgarh factory ही या कंपनीची जगातील सर्वात मोठी फॅक्टरी आहे. जेसीबीशिवाय ही कंपनी स्कीड स्टीट लोडर, टेलिस्कॉपिक हेण्डलर, डिझेल जनरेटर आणि डिझेल इंजिनचीही निर्मिती करते. आज घडीला भारतातून सर्वात जास्त निर्यात जेसीबीची होत आहे. जेसीबीच्या तिनशे वेगवेगळ्या मशिनरी बाजारात आहेत. या कंपनीचे ब्रिटन, जर्मनी, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, चीनमध्ये एकूण १८ कारखाने आहेत.

 
 

ब्रॅण्ड रजिस्टर करण्यासाठी ६५ वर्षे लागली

'जेसीबी' हा ब्रॅण्ड रजिस्टर करण्यासाठी ६५ वर्षे जावी लागली. २००९ साली हा ब्रॅण्ड रजिस्टर झाला. हा पहिला असा ब्रॅण्ड आहे जो रजिस्टर करण्यासाठी इतका वेळ लागला. त्यानंतरच या नावाने बॅकहो लोडर ओळखला जाऊ लागला.

 

यासाठी वापरला जातो पिवळा रंग

पिवळा रंग हा सुरुवातीपासूनच जेसीबीला देण्यात आला आहे. पिवळ्या रंगाचा वापर हा धोकादायक वस्तू दाखवण्यासाठी वापरला जातो. विषारी वायू, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम पदार्थ आदी दर्शवण्यासाठी हा रंग वापरला जातो.

 

२००० कोटींची गुंतवणूक

जेसीबीने भारतात २ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. आजमितीला पाच हजार जणांना थेट रोजगार या कंपनीद्वारे उपलब्ध झाला आहे. ६० डिलर्स आणि ६५० दालनांमधून भारतभर जेसीबीच्या व्यापार चालतो. आत्तापर्यंत याद्वारे ६ हजार जणांना जेसीबी चालवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या कंपनीचे पुणे, कोलकाता, चेन्नई, गुहावटी आदी शहरांमध्ये सुटे भाग घाऊक विक्रेते आहेत.

 

सामाजिक क्षेत्रालाही हातभार

'जेसीबी' या कंपनीद्वारे होणाऱ्या नफ्यातून सामाजिक दायित्व म्हणून (सीएसआर) मदत केली जाते. लेडी बॅमफोर्ड चॅरिटेबल ट्रस्ट ही २००० मध्ये नोंदणी केलेली संस्था विकासकामांसाठी मदत गरत असते. जवळपास ५० शाळांतून १२ हजार ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.






माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat



@@AUTHORINFO_V1@@